BJP should honor MLA Divya Rane by giving her a ministerial post Dainik Gomantak
गोवा

'पर्येत इतिहास घडवला, दिव्या राणेंना मंत्रिपद देऊन सन्मान करा'

पर्ये मतदारसंघात गेल्या 50 वर्षानंतर भाजपला यश

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले : पर्ये मतदार संघातून या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणून आलेल्या डॉ. दिव्या विश्वजीत राणे यांनी सर्वात जास्त मतांची आघाडी घेऊन इतिहास घडवला आहे. त्यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाला पर्ये मतदार संघात गेल्या 50 वर्षा नंतर यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांचा मंत्रीमंडळात समावेश असणे स्वाभाविक असून त्यांचा पक्षाच्या नेतृत्वाने विचार करावा अशी जोरदार मागणी सद्या पर्ये मतदारसंघातील जनतेकडून विविध माध्यमातून केली जात आहे.

यावेळी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या 50 वर्षा पासून पर्ये मतदार संघातून निवडून येणारे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी राजकीय निवृत्ती घेतली असल्याने, या मतदारसंघांतून डॉ दिव्या राणे (divya-rane) यांना भारतीय जनता पक्षाच्या (BJP) चिन्हावर उभे केले होते, त्यांना पर्येतील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सुमारे 14 हजार मतांची आघाडी देऊन निवडून आणले, या विजयाने त्यांनी पर्ये मतदार संघातून प्रथम महिला आमदार होण्याचा मान मिळवला आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्यावतीने पर्येत पहिल्या आमदार, तसेच राज्याच्या राजकीय इतिहासात एवढ्या मोठ्या मतांची आघाडी घेण्याचा विक्रम आमदार डॉ दिव्या राणे यांच्या नावावर नोंद झाला आहे.

पर्ये मतदार संघातून निवडून आलेल्या डॉ दिव्या राणे यांनी पहिल्यांदाच राजकीय फलाटावर इतिहास घडवला आहे, त्यामुळे त्यांना मंत्रीपद देऊन त्यांचा भारतीय जनता पक्षाने योग्य सन्मान करावा अशी पर्ये मतदार संघातील जनतेची इच्छा आहे, मागणीची दखल पक्षानी घ्यावी असे मत होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर यांनी व्यक्त केले आहे.

या वेळी स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात पर्ये (poriem) मतदारसंघातून भरघोस मतांची आघाडी घेऊन निवडून आलेल्या डॉ दिव्या राणे यांना मंत्रिपद मिळणे स्वाभाविक असून, त्या एक उत्कृष्ट डॉक्टर असून त्यांच्याकडे मतदार संघातील तसेच राज्यातील जनतेला न्याय देण्याची कार्यक्षमता आहे. त्यामुळे यांची दखल पक्ष नेतृत्वाने घेऊन त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करावा अशी प्रतिक्रिया गोवा धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष बि. डी. मोटे यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. दिव्या राणे यांना पर्ये मतदारसंघातील जनतेने यावेळी भरघोस मतांची आघाडी दिली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपद देणे म्हणजे पर्ये मतदारसंघातील जनतेचा खरा सन्मान ठरणार आहे. याचा विचार करून त्यांना मंत्रिमंडळात समावेश करावा असे मत पिसुर्ले पंचायतीचे माजी सरपंच (Sarpanch) तथा विद्यमान पंच देवानंद परब यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT