आमदार रोहण खवंटे  Dainik Gomantak
गोवा

'मुख्यमंत्र्यांसकट भ्रष्टाचारी मंत्र्यांची भाजपने हाकलपट्टी करावी'

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आमदार खवंटे यांची मागणी

Dainik Gomantak

Goa: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Former Governor Satypal Malik) यांनी 'मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) व गोवा भाजप सरकारवर (Goa BJP Govt) भ्रष्टाचार केल्याचा आरोप' केल्यानंतर (Allegations of corruption) अपक्ष आमदार रोहन खवंटे (Independence MLA Rohan Khaunte) यांनी मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली. (Demand for resignation)

पत्रकारांशी बोलताना खवंटे म्हणाले की, राज्यपाल असताना सत्यपाल मलिक यांच्याशी झालेल्या संवादात, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भ्रष्टाचार केल्याची कबुली दिली होती. मलिक पुढे म्हणाले की, “गोव्याचा राज्यपाल असताना, असे भ्रष्ट सरकार कधीही पाहिले नसल्याचे सांगितले आहे. मुलाखतीमध्ये बोलताना मलिक म्हणाले, “गोवा सरकार कितीतरी खोलपर्यंत भ्रष्टचार करण्यात गुंतले आहे.”

गोवा भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही तसेच मुख्यमंत्र्यांनी लगेच राजीनामा द्यावा, असे आमदार खवंटे म्हणाले. त्यांनी हेही निदर्शनास आणून दिले आहे की, 'मुख्यमंत्र्यांवर आरोप लावणारा दुसरा तिसरा कोणी विरोधक नसून 'सत्यपाल मलिक' भाजपचे हे एक ज्येष्ठ नेते आहेत, ज्यांचा आरएसएसशी संबंध आहे आणि त्यांनी हा आरोप केला आहे.

“मुख्यमंत्र्यांनी कृपा करून राजीनामा द्यावा किंवा भाजपने भ्रष्टाचारात गुंतलेल्या इतर मंत्र्यांसह त्यांची हकालपट्टी करावी,” असे आमदार खवंटे म्हणाले. खवंटे म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत हा मुद्दा अधिक गंभीर आहे. कोविड काळात भ्रष्ट सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वार्थामुळे सर्वसामान्य लोकांना जीव गमवावा लागला असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT