Manoj Parab, Nilkanth Halarnkar  Dainik Gomantak
गोवा

'आधी निवडणूक जिंकून दाखवा, लोकांची दिशाभूल करून मनोज परबांनी राजकीय पोळी भाजू नये'; मंत्री नीळकंठ हळर्णकर

Manoj Parab Nilkanth Halarnkar controversy: केंद्र सरकारने जीएसटीच्या कर प्रणालीमध्ये कपात केल्याने, सध्या भाजपाकडून सर्वत्र जीएसटी उत्सव साजरा करून लोकांमध्ये जागृती केली जात आहे.

Sameer Panditrao

म्हापसा: केंद्र सरकारने जीएसटीच्या कर प्रणालीमध्ये कपात केल्याने, सध्या भाजपाकडून सर्वत्र जीएसटी उत्सव साजरा करून लोकांमध्ये जागृती केली जात आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने, शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी पिर्ण - बार्देश येथे मंत्री नीळकंठ हळर्णकर हे भाजपा कार्यकर्त्यांसोबत गावात जागृती करतेवेळी, आरजीपी कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना लक्ष्य करून प्रश्न विचारण्याचे प्रयत्न केले.

यावेळी भाजपा व आरजीपी कार्यकर्ते आमने-सामने आल्याने येथील वातावरण बरेच तंग राहिले. दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची व घोषणाबाजीचा राजकीय कलगितुरा रंगला.

कोलवाळ पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गट आमने-सामने येऊ नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी घेतली. यावेळी पोलिस व मनोज परब यांच्यातही शाब्दिक बाचाबाची झाली.

भाजपा व आरजीपी कार्यकर्ते एकमेकांना पाहून मोठमोठ्याने घोषणाबाजी व हातवारे करू लागले. भाजपावाल्यांकडून ‘भारत माता की जय’, ‘नीळकंठ हळर्णकर तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी देवू लागले, तर दुसरीकडे आरजीपीवाले ‘ऊजो ऊजो म्हणून मंत्री व भाजपा कार्यकर्त्यांना हुर्यो घालण्यात आल्या’. त्यामुळे बराचवेळ वातावरण तंग बनले.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कोलवाळ पोलिस निरीक्षक संजीत कांदोळकर हे आपल्या पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी हजर होते. यावेळी आरजीपीचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी अनेकदा रस्त्यावरून चालत जाणाऱ्या नीळकंळ हळर्णकर यांना प्रश्न विचारत त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

लोकांची दिशाभूल करून मनोज परब यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजू नये. जी दुकाने पाडली जाणार असे परब दावा करताहेत, मनोज परब हे मुद्दामहून लोकांची दिशाभूल करीत आहेत. मुळात लोकांच्या संरक्षणासाठी भाजपा सरकार कार्यरत आहे. कोलवाळमधील राम मंदिर किंवा स्थानिक लोकांची घरे पाडली जाणार नाहीत. या आस्थापनांवर तशी स्थिती ओढवली तर मी सर्वात पुढे लोकांसोबत उभे राहीन. मनोज परब यांनी आधी निवडणूक जिंकून दाखवावी.
- नीळकंठ हळर्णकर, मच्छीमारमंत्री

‘... मगच जीएसटी उत्सव साजरे करा’

यावेळी मनोज परब यांनी हळर्णकरांना प्रश्न केले की, रस्ता रुंदीकरणाच्या नावाने पिर्णमधील स्थानिकांना तसेच दुकानदारांना नोटीसा आल्या आहेत. त्यांची घरे सुरक्षित राहणार की नाही, हे मंत्र्यांनी आधी सांगावे. नंतर जीएसटी उत्सव साजरे करावे. मंत्री हळर्णकर हे ग्रामसभेला का आले नाहीत? स्थानिकांना गरज असते, तेव्हा ते गावात येत नाहीत, अशी कोपरखळी त्यांनी मंत्र्यांना लगावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या; अंतिम सामन्यात अभिषेक, हार्दिक आणि तिलक खेळणार नाही? कोचने दिलं अपडेट

Watch Video: 'मौलाना विसरले सत्तेत कोण आहे, असा धडा शिकवू की तुमची येणारी पिढी दंगा करणे विसरेल'; योगींचा इशारा

"जमाना ती आश्वासनां दिऊ नाकां,जाता तेंच उलय" मंत्री कामतांच्या 'त्या' आश्वासनावर पोळजींचा टोला Watch Video

दोडामार्ग घटनेमागे मंत्री राणे सूत्रधार, त्यांना अटक करा; सिंधुदुर्गात हिंदू–मुस्लिम तणाव वाढविण्यास तेच जबाबदार - मविआ

Goa Police: जिल्हा दंडाधिकाऱ्यांना 'NSA' कायदा लागू करण्याचा अधिकार द्या, गोवा पोलिसांचा राज्य सरकारकडे महत्त्वपूर्ण प्रस्ताव

SCROLL FOR NEXT