Goa Police: जिल्हा दंडाधिकाऱ्यांना 'NSA' कायदा लागू करण्याचा अधिकार द्या, गोवा पोलिसांचा राज्य सरकारकडे महत्त्वपूर्ण प्रस्ताव

goa police nsa proposal: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी राज्य सरकारला महत्त्वपूर्ण प्रस्ताव दिला आहे.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी राज्य सरकारला महत्त्वपूर्ण प्रस्ताव दिला आहे. नुकत्याच झालेल्या रामा काणकोणकर या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा संदर्भ देत, पोलिसांनी सरकारला पत्र लिहून जिल्हा दंडाधिकाऱ्यांना (District Magistrate) राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू करण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणी केली आहे.

पोलिसांचे पत्र

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, गोवा पोलिसांनी राज्याच्या गृह विभागाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "सध्याच्या परिस्थितीत, उत्तर व दक्षिण गोव्यातील दोन्ही जिल्हा दंडाधिकाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या कलम ३ (२) अंतर्गत अधिकार देणे आवश्यक आहे. हे अधिकार एका निश्चित कालावधीसाठी देण्यात यावेत, असेही पत्रात नमूद आहे.

या कायद्याचा उद्देश राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या व्यक्तींना कारवाई करण्यापूर्वीच ताब्यात घेण्याचा अधिकार देणे आहे.

पोलिसांनी पुढे स्पष्ट केले आहे की, १ ऑगस्ट २०२५ पासून अनेक गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक अटकेच्या कलमांखाली ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र हे उपाय वारंवार गुन्हे करणाऱ्या आणि गुन्हेगारीत सहभागी असलेल्या घटकांना आळा घालण्यासाठी अपुरे ठरत आहेत.

हा प्रस्ताव कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या एका आठवड्यानंतर आला आहे. सात जणांनी काणकोणकर यांना मारहाण केली होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर शेण फासले होते.

या घटनेनंतर गेल्या शुक्रवारी पणजीत आंदोलन झाले. विरोधक आणि कार्यकर्त्यांनी या हल्ल्याला “जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न” असे म्हटले होते. तसेच, “गोव्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे” असा आरोपही केला.

आंदोलकांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची मागणी केलीय. तसंच काणकोणकर यांना पोलिस सुरक्षा द्यावी आणि हल्ल्यामागील “मुख्य सूत्रधार” कोण आहे याचा राजकीय संबंधांसह निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी केली.

Goa Police
Goa Tourism: 20 वर्षांपूर्वी असं न्हवतं! आधुनिकतेमागे धावताना गोव्याने पर्यटनातला Essense गमावलाय?

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या आठवड्यातच या प्रकरणी कडक कारवाईचे आश्वासन दिले होते आणि “अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत” असे त्यांनी स्पष्ट केले होते. पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली असून त्यात मुख्य आरोपी झेनिटो कार्डोझो (३६) याचा समावेश आहे. हल्ला त्याच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप आहे.

पणजी न्यायालयाने या आठही आरोपींना शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत पाठवले. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, पोलिसांनी वैयक्तिक वादामुळे त्यांना मारहाण करण्यात आली अशी शक्यता व्यक्त केलीय.

Goa Police
Goa Tourism: 20 वर्षांपूर्वी असं न्हवतं! आधुनिकतेमागे धावताना गोव्याने पर्यटनातला Essense गमावलाय?

सरकारला पाठवलेल्या प्रस्तावात, पोलिसांनी गेल्या काही महिन्यांत कारवाईतून अटक झालेल्यांची आकडेवारीही जोडली आहे. तसेच, कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्यातील अनेक आरोपी हे जुने गुन्हेगार असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com