SADANAND SHET TANAVADE Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: जनतेने मंत्र्यांना भेटावे कुठे? तानावडेंनी करून दिली मुख्यमंत्र्याच्या सूचनेची आठवण

Sadanand Tanavade: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्र्यांना आठवड्यातून एकदा मंत्रालयात उपस्थित राहण्याची सूचना केल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी दिली.

Sameer Panditrao

पणजी: मंत्री जनतेला सहजपणे उपलब्ध झाले पाहिजेत. पूर्वी मंत्रालयात मंत्री मिळत, पण आता काहीजण आपल्या कार्यालयात बसतात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याचमुळे मंत्र्यांना आठवड्यातून एकदा मंत्रालयात उपस्थित राहण्याची सूचना केल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

मतदारसंघाच्या बाहेरील व्यक्तीस मंत्र्याला कुठे भेटावे हा प्रश्‍‍न आजही आहे, अशी कबुलीही त्‍यांनी दिली. आठवड्यातून दोनदा मंत्री जनतेसाठी उपलब्ध असले पाहिजेत. त्यासाठी मोठा दरबार भरवण्याची गरज नाही. जनतेचे प्रत्येक काम होतेच असे नाही. मात्र आपले म्हणणे संबंधितापर्यंत पोचवल्‍याचे समाधान लोकांना मिळाले पाहिजे. निदान तालुका पातळीवर मंत्र्यांनी उपस्थित राहिले पाहिजे, असे तानावडे म्‍हणाले.

भाजपच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम कोणत्या दिशेने सुरू आहे याचे चिंतन केले पाहिजे. लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकणार असे वातावरण तेव्हा होते, पण प्रत्यक्षात तसे यश मिळाले नाही. मतदारांच्या सातत्याने संपर्कात न राहिल्याचा तो परिणाम होता. त्याचा जबाबदारी मी स्‍वीकारतो, असेही तानावडे म्‍हणाले.

दामूंच्‍या नावाची १८ रोजी घोषणा!

फातोर्ड्याचे माजी आमदार दामू नाईक यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा १८ जानेवारी रोजी होण्याची औपचारिकता आता बाकी राहिली आहे. या निवडणुकीसाठीचे केंद्रीय निरीक्षक १७ रोजी गोव्‍यात दाखल होत आहेत. ‘दामू नाईक यांचे पारडे जड’ असे वृत्त ‘गोमन्तक’ने दिले होते. त्‍यांच्‍यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.

२१ वर्षे भाजपच्या गाभा समितीत आहे. सचिव, सरचिटणीस ते प्रदेशाध्यक्ष असा प्रवास केला. आता नव्याला संधी द्या असे पक्षाला सांगितले आहे. पक्षाचे काम करणाऱ्या प्रत्येकाचे प्रदेशाध्यक्ष होण्याचे स्वप्न असलेच पाहिजे.
सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय भाविकांसाठी खुशखबर! गोव्याहून शिर्डी-तिरुपतीसाठी सुरु होणार विमानसेवा; खासदार तानावडेंनी केली खास मागणी

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

10 चौकार, 9 षटकार... 44 चेंडूत ठोकलं शतक! हार्दिक पांड्याचा 'हा' सहकारी खेळाडू रातोरात बनला स्टार; पदार्पण सामन्यात केला वर्ल्ड रेकॉर्ड

Panjim Fire: सेरेंडिपीटी महोत्सवाच्या सेटला लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, पणजीत टळली मोठी दुर्घटना; Watch Video

SCROLL FOR NEXT