Save Mhadai-Save Goa Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: भाजपने म्‍हादईप्रश्‍‍नी शहांच्‍या सभेत भूमिका स्‍पष्‍ट करावीच

‘सेव्ह म्हादई-सेव्ह गोवा’ : गोमंतकीयांना खरे काय ते सांगा

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute म्हादईचा सौदा करणाऱ्या गोव्‍यातील भाजप सरकारने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या फर्मागुढीतील जाहीर सभेत आपली भूमिका स्पष्ट करावी आणि गोमंतकीयांना जे खरे आहे तेच सांगावे, असे आव्हान ‘सेव्ह म्हादई-सेव्ह गोवा मुव्हमेंट’चे कार्यकर्ते तथा गोवा फॉरवर्डचे नेते प्रशांत नाईक यांनी फर्मागुढी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिले.

यावेळी संघटनेच्‍या कार्यकर्त्या तथा ‘आप’च्‍या नेत्या प्रतिमा कुतिन्हो, तृणमूल काँग्रेसचे जयेश शेटगावकर, पर्यावरणप्रेमी फ्रेडी त्रावासो व शंकर पोळजी उपस्थित होते.

अमित शहा यांनी बेळगावच्या सभेत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेत म्हादईचे पाणी कर्नाटकला देण्याचे ठरले असल्याचे सांगितले होते. म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे आणि म्हादईला कुणीच पळवू शकत नाही.

अशा स्थितीत गोव्याचे मुख्यमंत्री कसा काय सौदा करू शकतात? या प्रकरणी सारवासारव करणारे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हादईचा विषय केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत उपस्‍थित करून ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ हे स्पष्ट करावे, असे नाईक म्हणाले.

शहांच्‍या सभेला पैसे देऊन गर्दी

प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या की, म्हादई कर्नाटकला विकणाऱ्या भाजप सरकारने गोमंतकीयांनी नेमके काय खरे आणि काय खोटे ते सांगावे.

अमित शहा यांच्या सभेला पैसे देऊन महिलांची गर्दी जमवण्याचा प्रयत्न भाजप सरकारने चालविल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला.

तर, शंकर पोळजी म्हणाले की, म्हादई म्हणजे गोव्याचे सर्वस्व आहे. गोवा म्हणजे नंदनवन. पण गोव्याचा नरक बनवण्याच प्रकार सध्‍या सुरू आहे. दरम्‍यान, जयेश शेटगावकर यांनीही म्हादईसाठी लढा तीव्र करण्याची गरज व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT