Rohan Khanwate Dainik gomanatak
गोवा

पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष; आमदारांनीच ‘खो’ घातला

पर्वरी मतदारसंघात पायाभूत सुविधांचा अभाव असून, त्याकडे आमदार खवंटे यांनी लक्ष दिले नाही. केवळ राजकीय स्टंटबाजी व वक्तव्ये करण्यात ते व्यग्र राहिले...

दैनिक गोमन्तक

म्हापसा Mapusa : पर्वरी विधानसभा मतदारसंघातील विकासकामे खुंटण्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) अथवा त्यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार जबाबदार नसून, त्याबाबत स्थानिक आमदार रोहन खंवटे (Rohan Khanwate) हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, असा पर्वरी भाजप (BJP) मंडळ समितीच्यावतीने बोलताना अध्यक्ष किशोर अस्नोडकर यांनी केला आहे. तसेच, पर्वरीतील 5 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचा प्रश्न हा सरकारपेक्षा तांत्रिक तसेच रॉ वॉटरच्या अर्थांत कच्च्या पाण्याच्या समस्येमुळे निर्माण झाला असल्याचा दावा त्यांनी केला.

म्हापसा येथील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मंडल अध्यक्ष किशोर अस्नोडकर म्हणाले, पर्वरी मतदारसंघात पायाभूत सुविधांचा अभाव असून, त्याकडे आमदार खवंटे यांनी लक्ष दिले नाही. केवळ राजकीय स्टंटबाजी व वक्तव्ये करण्यात ते व्यग्र राहिले. मुळात पर्वरीतील जलशुद्धीकरण प्रकल्प हा तांत्रिक तसेच कच्च्या पाण्याच्या समस्येमुळे रखडला आहे. यासंदर्भात आम्ही संबंधित मंत्री व अभियंत्यांकडून माहिती घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी स्थानिक जिल्हा पंचायत सदस्य कार्तिक कुडणेकर, संदीप वझरकर, राजेश सावईकर, अशोक शेटी उपस्थित होते.

मुळात पर्वरी भागात तीव्र पाण्याची समस्या आहे. परंतु, स्थानिक आमदाराचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. मतदारसंघातील जलवाहिन्यांना जुनाट झाल्या असून, त्या बदलण्यासाठी आमदारांनी प्रयत्न केले नाहीत. मागील दहा वर्षे ते पर्वरीचे लोकप्रतिनिधित्व करतात. जेव्हा जेव्हा भाजपकडून पाण्याची समस्या सोडवण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा तेव्हा या-त्या कारणांवरून आमदारांनी त्यास खो घातल्याचा आरोप अस्नोडकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT