Damu Naik Along With President of BJP J.P.Nadda and goa chief Minister Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: आमदार, मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यास सुरुवात; दामू नाईक यांची दिल्लीतून परत आल्यावर पहिली प्रतिक्रिया

Goa Politics: भाजपच्या गोवा प्रदेश समिती आणि दोन्ही जिल्हा समित्यांच्या रचनेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: भाजप आमदार, मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यास सुरुवात झालीय. खात्यातील काम, जनसंपर्क तसेच, महामंडळाच्या अध्यक्षांच्या कामगिरीचाही आढावा घेतला जाणार, अशी माहिती भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष दामोदर उर्फ दामू नाईक यांनी दौऱ्यावरुन परतल्यानंतर दिली.

भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष दामोदर उर्फ दामू नाईक यांचा दिल्ली दौरा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांची त्यांनी भेट घेतली.

भाजपच्या गोवा प्रदेश समिती आणि दोन्ही जिल्हा समित्यांच्या रचनेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना या नव्या समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी हा दौरा उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

या दौऱ्यात भाजप प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रीय नेतृत्वासोबत पक्ष संघटनेच्या भविष्यातील धोरणांवर सविस्तर चर्चा केली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. गोव्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच ढवळून निघाले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही दिल्लीत असल्याने राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या शक्यतेवर चर्चा सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या दिल्लीतल्या उपस्थितीला विशेष महत्त्व आले आहे.

गोव्यात आगामी काळात भाजप संघटनेत काही महत्त्वाचे बदल होण्याची चिन्हे आहेत. समित्यांमध्ये निष्ठावंत नेत्यांना आणि नव्या चेहऱ्यांना स्थान मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत चर्चा होत असली तरी याबाबतची अंतिम घोषणा अद्याप झालेली नाही.

मात्र, या दौऱ्यामुळे भाजपच्या संघटनात्मक पातळीवर सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांमध्ये नव्या नेतृत्वाबद्दल उत्सुकता असून, पक्ष संघटना अधिक भक्कम करण्यासाठी या दौऱ्याचा उपयोग होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणुसकीशून्य कोडगेपणा! तत्परतेसाठी 25 लोक जळून मरायची वाट का पाहिली? देशभर नाचक्की झाल्यावर 'इभ्रत' राखण्याची मोहीम- संपादकीय

Arpora Nightclub Fire : हडफडे अग्नितांडव! अजय गुप्ताला दिल्लीतून अटक, 'गोगी टोळी'सह 'काळ्या पैशाचे' लागेबांधे उघड

अग्रलेख: शनिवारची रात्र ठरली भयाण किंकाळ्यांची! हडफडे अग्निकांडाने उफळला संताप, 25 बळींचा हिशोब कोण देणार?

Arpora Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेला कायदेशीर वळण! 'एसआयटी' चौकशीसाठी हायकोर्टात याचिका दाखल; 16 डिसेंबरला सुनावणी

वास्कोत भररात्री गोंधळ! प्रार्थनास्थळी दानपेटी फोडली, मूर्तीचे नुकसान, अंतर्वस्त्रे घालून फिरणाऱ्या व्यक्तीवर संशय; कोण आहे हा 'अर्धनग्न' संशयित?

SCROLL FOR NEXT