Savio Rodrigues tweet Dainik Gomantak
गोवा

भाजप आमदाराने घेतली कार्यकर्त्याकडूनच लाच! 10 लाख उकळले; सावियोंच्‍या ट्विटमुळे खळबळ

Savio Rodrigues tweet: सावियो रॉड्रिगीस यांनी भाजपच्या एका आमदाराने भाजपच्याच एका कार्यकर्त्याचा गृहप्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेतली असा आरोप करणारे ट्विट केलंय.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: हडफडे दुर्घटना हे प्रशासन पुरस्कृत हत्‍याकांड असून त्यास मुख्यमंत्री जबाबदार आहेत असा आरोप करणारे भाजपचे माजी राज्य प्रवक्ते सावियो रॉड्रिगीस यांनी भाजपच्या एका आमदाराने भाजपच्याच एका कार्यकर्त्याचा गृहप्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेतली असा आरोप करणारे ट्विट केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे.

या ट्विटनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी, रॉड्रिगीस हे कदाचित भाजपचे सदस्य असतील, पण राज्य कार्यकारिणीवर त्यांना कुठलेही स्थान नाही असा खुलासा केला आहे. भाजप सरकारमध्‍ये असलेल्या मंत्र्यांवर ‘कॅश फॉर जॉब’ तसेच गोव्यात भाजपमध्ये ‘कमिशनराज’ सुरू झाल्‍याचा आरोप होत असतानाच भाजपच्याच माजी प्रवक्त्यांनी असा आरोप केल्याने राज्यात तो चर्चेचा विषय ठरला आहे.

यासंदर्भात सावियो रॉड्रिगीस यांच्‍याशी संपर्क साधला असता ‘‘खात्रीलायक माहितीवरून आपण हे ट्विट केले आहे. तो कार्यकर्ता काही महिन्‍यापूर्वीच भाजप कार्यकारिणीवर आलेला आहे’’ असे त्‍यांनी सांगितले. तर, भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांना विचारले असता त्‍यांनी सांगितले की, आपल्‍याला यासंदर्भात काहीच माहिती नाही. सावियो रॉड्रिगीस हे भाजपच्‍या कार्यकारिणीवर नाहीत.

दरम्‍यान, कुणीही कसलेही आरोप केले म्‍हणून त्‍यात तथ्‍य असेलच असे होत नाही. हे आरोप खरे की खोटे हे तपासण्‍याची गरज आहे. यासंदर्भात मी पश्रश्रेष्‍ठींशी बोललो आहे. पक्षश्रेष्‍ठी चौकशी करतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि वाहतूकमंत्री माविन गुदिन्‍हो यांनी त्‍यांना यासंदर्भात विचारलेल्‍या प्रश्‍‍नावर उत्तर देताना व्‍यक्त केली.

दोन हप्‍त्‍यांत पैसे केले परत

सावियो रॉड्रिगीस यांनी ‘गोवा पॉलिटिकल गॉसिप’ असा मथळा देऊन केलेल्या ट्विटमध्ये म्‍हटले आहे की, गोव्यात पहिल्याच वेळेला निवडून आलेल्या एका भाजप आमदाराने भाजपच्याच एका कार्यकर्त्याचा गृहप्रकल्‍प मंजूर करून घेण्‍यासाठी दहा लाखांची लाच घेतली. एका मंत्र्याला हे पैसे द्यायचे आहेत असे त्‍याने सांगितले होते.

कालांतराने ज्‍या कार्यकर्त्याकडून पैसे घेतले होते, तोच कार्यकर्ता भाजप कार्यकारिणीवर आला. त्‍याने त्‍या मंत्र्याकडे चौकशी केली असता ‘‘आपण कुणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत’’ असे त्‍याने सांगितले. नंतर त्‍या आमदाराला बोलावून कार्यकर्त्याचे पैसे दोन महिन्‍यांत परत करा असे सांगण्‍यात आले. विशेष म्‍हणजे त्‍याने ते परत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: अमित पालेकरांना 'आप' प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं! "वापरा आणि फेकून द्या" काँग्रेसने लगावला टोला

Margao: विद्युत रोषणाईने मडगाव शहर उजळले, गोमंतकीयांमध्ये नाताळचा उत्साह; बाजारपेठा साहित्याने सजल्या; खरेदीसाठी उडतेय झुंबड

Mahavir Sanctuary: महावीर अभयारण्यात होणार खनिज हाताळणी, वनजमिनीचा वापर करण्यास परवानगी; पर्यावरणवाद्यांना धक्का

Goa Live Updates: दहावीची परीक्षा 13 मार्चपासून, वेळापत्रक जारी

जिल्हा पंचायतीच्या दारात 'नोकरी'चा प्रश्न; आमदारांच्या फुकटच्या श्रेयावर नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा 'धाक' हवा!

SCROLL FOR NEXT