Mhaje Ghar Scheme Dainik Gomantak
गोवा

Mhaje Ghar: 'माझे घर'मुळे भाजपमध्ये चैतन्‍य, अर्ज वाटप कार्यक्रमांना जनतेकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद; विरोधकांत निराशा

mazh ghar campaign: राज्‍य सरकारच्‍या महत्त्‍वाकांक्षी ‘माझे घर’ योजनेला पहिल्‍याच दिवसापासून जनतेचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत असल्‍याने भाजप नेत्‍यांमध्‍ये आनंद आणि समाधानाचे वातावरण आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्‍य सरकारच्‍या महत्त्‍वाकांक्षी ‘माझे घर’ योजनेला पहिल्‍याच दिवसापासून जनतेचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत असल्‍याने भाजप नेत्‍यांमध्‍ये आनंद आणि समाधानाचे वातावरण आहे, तर विरोधकांत कमालीची निराशा आहे. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सोमवारपासून स्‍वत: विविध मतदारसंघांत जाऊन योजनेच्‍या अर्जांचे वितरण करीत असल्‍यामुळे या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी लाभत आहे.

कोमुनिदाद, सरकारी, खासगी जमिनीत उभारलेली तसेच १९७२ च्‍या सर्वे आराखड्यात नोंद असलेली घरे संबंधितांच्‍या नावावर नव्‍हती. यातील अनेक घरे न्‍यायालयाच्‍या आदेशामुळे जमीनदोस्‍तही होण्‍याची शक्‍यता होती. त्‍यामुळेच मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही महिन्‍यांपूर्वी अशी घरे कायदेशीर करण्‍याचा निर्णय घेतले. याबाबतची विधेयके त्‍यांनी पावसाळी अधिवेशनात मांडल्‍यानंतर यावरून विरोधकांनी सभागृहात गदारोळ माजवला.

राज्‍यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनीही या विधेयकांना मान्‍यता दिल्‍यानंतर त्‍यांचे कायद्यात रुपांतरण झाले. सरकारने गेल्‍या सोमवारपासून या योजनेअंतर्गत अर्जांचे वितरण करण्‍यास सुरुवात केली आहे.

राज्‍यातील हजारो कुटुंबांची घरे अजूनही त्‍यांनी नावावर नव्‍हती. अशा कुटुंबांनी अर्ज वितरण कार्यक्रमांना उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद देण्‍यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, विरोधकांनी या विषयावर भाष्‍य करणे टाळले आहे.

जि.पं.साठी निर्णय लाभदायक

आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजली जाणारी जिल्‍हा पंचायत निवडणूक १३ डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी ‘माझे घर’ योजनेचा भाजपला निश्‍चिचत फायदा होईल, असा विश्‍‍वास नेते आणि कार्यकर्त्यांकडून व्‍यक्त केला जात आहे.

प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक म्‍हणतात...

‘माझे घर’ योजनेमुळे गोमंतकीय जनतेचे अनेक वर्षांचे स्‍वप्‍न पूर्ण झाले आहे. त्‍यामुळेच अर्ज वितरण कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. योजनेला विरोध करणाऱ्या आमदारांनीही आता अर्ज वाटप कार्यक्रमांना उपस्‍थिती लावण्‍यास सुरुवात केली आहे, हे या योजनेचे यश आहे.

लोकांसाठी महत्त्‍वपूर्ण असलेली योजना विरोधी पक्षांच्‍या आमदारांना नको होती. त्‍यामुळेच त्‍यांनी विधानसभेत गदारोळ माजवला होता. आगामी जिल्‍हा पंचायत निवडणूक काळात जनता त्‍यांना दारातही उभे करून घेणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT