Utpal Parrikar

 
Dainik Gomantak
गोवा

उत्पल पर्रीकरांना डावलून बाबूशना पणजीत उमेदवारी?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचे संकेत, नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता

आदित्य जोशी

पणजी : पणजीत उत्पल पर्रीकरांऐवजी बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारीचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) हे पणजीतून भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र पुन्हा एकदा उमेदवारीची माळ बाबूश मोन्सेरात यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.

उत्पल पर्रीकर हे मनोहर पर्रीकर यांचे मुलगे असून पणजी विधानसभेच्या (Goa Assembly Election) जागेसाठी आग्रही आहेत. नुकतीच त्यांनी उमेदवारीसाठी दिल्लीवारी केल्याचंही समोर आलं होतं. मात्र नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बाबूश हेच पणजीतून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्येच (BJP) आधीच नाराजीनाट्य रंगल्याचं चित्र आहे. बाबू आजगावकरांना त्यांचा पेडणे मतदारसंघ सोडून मडगावमध्ये लढण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र आजगावकरांनी आपण आपल्या पेडणे (Pedne) मतदारसंघातूनच लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मायकल लोबो यांनीही नुकताच भाजपला घरचा आहेर दिला होता. त्यामुळे उत्पल पर्रीकरांसोबतच अन्य नेत्यांची नाराजी मिटवण्यात भाजपला यश येतं का हे येत्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अन्यथा हीच बंडखोरी भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Quepem: '..अंधाराची खंत तू कशाला करिसी रे'! अंथरुणाला खिळलेल्या 75 वर्षाच्या व्यक्तीचे घर कोसळले, श्रमधाममधून 15 दिवसात पुनर्बांधणी

Tiger Reserve Goa: व्याघ्र प्राधिकरणाच्या शिफारशींकडे कानाडोळा! जैविक संपदेच्या अस्तित्वाला धोका; ‘सर्वोच्च’ निकालाकडे लक्ष

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

Mhaje Ghar: ...तर ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी पडतील त्रासात! विरियातोंचा गंभीर इशारा; सरकारच्‍या धोरणांवर साधला निशाणा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

SCROLL FOR NEXT