Goa BJP, Sadanand Tanavade, Sankalp Amonkar Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: भाजपच्या पणजी मुख्यालयात जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी; Social Media वर आनंदोत्सव

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने सत्ता मिळवल्यानंतर भाजपने आज राज्यात जल्लोष केला. भाजपच्या नेते-कार्यकर्त्यांनी आपला आनंद समाज माध्यमांवर विविध प्रकारे व्यक्त केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Maharashtra Assembly Election BJP Celebration In Goa

पणजी: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने सत्ता मिळवल्यानंतर भाजपने आज राज्यात जल्लोष केला. भाजपच्या नेते-कार्यकर्त्यांनी आपला आनंद समाज माध्यमांवर विविध प्रकारे व्यक्त केला.

भाजपच्या पणजी येथील मुख्यालयातही आनंद सोहळा आयोजित करण्यात आला होता. आमदार संकल्प आमोणकर, दाजी साळकर, उल्हास नाईक तुयेकर आदींच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आज सकाळीच दिल्लीतून गोव्यात पोचले. त्यांनी या नेत्या कार्यकर्त्यांसह भाजप कार्यालयात दूरचित्रवाणीवर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल पाहिला.

या निकालादरम्यान सुरवातीपासूनच भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असे कल दिसू लागले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भाजपचे सरकार महाराष्ट्रात येणार हे स्पष्ट झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून आणि मिठाई वाटून हा आनंद साजरा करण्यात

तानावडे यांनी यावेळी सांगितले, की लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नव्हते. विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराचा फटका बसला होता. त्यामुळे जनता या खेपेला त्या अपप्रचाराला भुलणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली गेली होती.

महाराष्ट्रातील विजय ऐतिहासिक; कामत

महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पक्षाने मिळवलेला विजय हा ऐतिहासिक आहे. यापूर्वी भाजपने एवढ्या जागा जिंकल्या नव्हत्या. यावेळी भाजपने १३२ चा आंकडा पार केलेला आहे, अशी प्रतिक्रिया मडगावचे भाजपा आमदार दिगंबर कामत यांनी व्यक्त केली.

वास्कोतही आनंदोत्सव

वास्को भाजप मंडळाने आमदार कृष्णा साळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील भाजप महायुतीचा विजय साजरा केला. साळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत वास्को शहरात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT