BJP in Goa Dainik Gomantak
गोवा

निवडणुकीनंतर फोंड्यात भाजपला अच्छे दिन!

फोंडा तालुक्यात भाजपचे वर्चस्व सिद्ध, चार मंत्र्यांमुळे सोने पे सुहागा

दैनिक गोमन्तक

फोंडा : फोंडा पालिकेवर भाजपने बिनधास्त वर्चस्व सिद्ध केल्यानंतर आता मोर्चा कुर्टी - खांडेपार पंचायतीकडे वळवला आहे. फोंडा मतदारसंघात केवळ एक पालिका आणि एकच पंचायत असून या दोन्ही ठिकाणी रवी नाईकांच्या समर्थकांचीच वर्णी लागली आहे.

फोंडा पालिकेत रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर येत्या सोमवारी 18 रोजी कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीत सरपंचपदी रवी नाईक यांचे समर्थक दादी नाईक यांची निवड निश्‍चित झाल्यात जमा आहे. सध्या फोंडा तालुका भाजपने आपल्या ताब्यात घेतला असून तालुक्यातील चारही मंत्र्यामुळे अच्छे दिन नक्कीच येतील, अशी आशा मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

फोंडा पालिकेवर निवडणुकीनंतर निवड झालेल्या विद्यमान मंडळात सर्वाधिक काळ मगो पक्षाने आपला नगराध्यक्ष पालिकेवर बसवला होता. पण मध्यंतरीच्या काळात भाजपनेही आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न अल्पकाळ ठरला. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र भाजपने (BJP) पूर्ण ताकदीनिशी फोंड्यावर आपली सत्ता प्रस्थापित करताना पहिल्यांदाच फोंड्यात कमळ फुलवले. मात्र, हे कमळ फुलवताना काँग्रेसमधून भाजपात आलेले रवी नाईक यांच्यामुळेच शक्य झाल्याच्या प्रतिक्रिया मतदारांकडून व्यक्त होत आहेत.

फोंडा पालिकेचा कार्यकाळ एक वर्षाचा शिल्लक असताना सहाव्या नगराध्यक्षाची निवड झाली, तर कुर्टी - खांडेपार पंचायतीचा कार्यकाळ केवळ दीड महिना शिल्लक असताना नवव्या सरपंचाची निवड आता येत्या सोमवारी होणार आहे. तालुक्यात फोंडा शहर हे फार महत्त्वाचे आहे. वास्तविक फोंडा हे राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी या शहर परिसरात होतात, त्याचबरोबर फोंडा तालुका हा देवदेवतांच्या मंदिरांच्या मांदियाळीत वसल्यामुळे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असलेल्‍या या तालुक्याला आता चार मंत्री मिळाल्याने दिवस पालटणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थातच फोंडा तालुक्याला आता अच्छे दिनांची प्रतीक्षा आहे.

फोंडा तालुक्याला क्रीडा तसेच वीजमंत्रिपद प्रथमच मिळाले आहे. विशेषतः फोंडा (Ponda) तालुका ही राज्याची सांस्कृतिक राजधानी असे म्हटले जात असले, तरी या तालुक्यात खेळाडूंची संख्याही काही कमी नाही. राष्ट्रीय पातळीवर चमकलेले खेळाडूही फोंडा तालुक्यात असून या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची ग्वाही क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली आहे. प्रथमच फोंड्याला क्रीडामंत्रिपद मिळाल्याने सध्या क्रीडापटूही खूष आहेत. दरम्यान, वीजमंत्रिपदी सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांची निवड झाल्याने तालुक्यातील अनेक भागातील ‘बत्ती गुल’ची समस्या निकाली काढण्यासाठी सुदिन ढवळीकर प्रयत्नरत राहतील आणि विनाखंड वीजपुरवठा तालुक्याला मिळेल असा दावाही फोंडावासीयांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT