Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Cash For Job: राज्यभरात गाजत असलेल्या नोकऱ्यांच्या चोरबाजाराचे पडसाद आज भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीतही उमटले. याप्रकरणी जाहीरपणे कोणीही वक्तव्ये करू नयेत, अशी तंबीही या बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant Chairs Meeting Of Goa BJP Amidst Cash For Job Scam Allegations

पणजी: राज्यभरात गाजत असलेल्या नोकऱ्यांच्या चोरबाजाराचे पडसाद आज भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीतही उमटले. याप्रकरणी जाहीरपणे कोणीही वक्तव्ये करू नयेत, अशी तंबीही या बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष दत्ता खोलकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि आमदार नीलेश काब्राल उपस्थित नव्हते. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर, दामोदर नाईक, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, आमदार दिगंबर कामत, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, सभापती रमेश तवडकर, प्रदेश खजिनदार संजीव देसाई यांनी बैठकीत सहभाग घेतला.

दिल्लीत उद्या (ता.२२) होणाऱ्या संघटनात्मक बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ४ लाख सदस्यांचे लक्ष्य गाठल्याची माहिती तानावडे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी राज्‍य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. त्यांनीच नोकऱ्यांच्या चोरबाजारप्रकरणी होत असलेल्या कारवाईची माहिती दिली.

या विषयावर बैठकीत जोरदार चर्चा झाली. याविषयी तानावडे यांना विचारल्यावर ते म्हणाले, राज्यातील घडामोडींचे पडसाद गाभा समितीत उमटणे हे स्वाभाविक आहे. कोणी हा विषय काढला हे महत्त्वाचे नाही. पूर्णतः पारदर्शी पद्धतीने चर्चा झाली. या विषयावर सरकार आणि पक्ष एकत्र असून कोणीही जाहीरपणे भाष्य करू नये, असे ठरविले आहे. पक्षाचे अधिकृत प्रवक्ते आणि सरकारकडून मुख्यमंत्री या विषयावर माहिती देतील.

...असे वागणे पक्षहिताचे नाही...

कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि सभापती रमेश तवडकर यांच्यातील वादावरही चर्चा झाली. तवडकर या बैठकीला थोडे उशिरा पोचले. त्याआधीच हा विषय चर्चेला आला होता. त्यानंतरही त्यांचे म्हणणे जाणून घेण्यात आले.

सत्ताधारी गोटातील एका घटकाने दुसऱ्याविषयी असे जाहीर वक्तव्य करूच नये, असा निर्णय घेण्यात आला आहे. कोणाला काही समस्या असेल वा दुसऱ्याकडून उपसर्ग होत असेल, तर त्याची माहिती आधी प्रदेशाध्यक्ष किंवा मुख्यमंत्र्यांना द्यावी.

तेथे तो प्रश्न सोडविला जाईल, असे ठरविण्यात आले आहे. तानावडे यांनी सांगितले की, गावडे यांना या निर्णयाची कल्पना त्यांना दूरध्वनीवरून किंवा पक्ष कार्यालयात बोलावून दिली जाईल.

यापूर्वीही वाद मिटवला गेला असताना पुन्हा पुन्हा असे वागणे पक्षाच्या आणि सरकारच्या हिताचे नाही. पक्षाची शिस्त सर्वांनाच पाळावी लागेल.

एका वाक्यात गुंडाळले प्रश्न

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही प्रदेशाध्यक्षच बैठकीची माहिती देतील, या एका वाक्यात पत्रकारांचे अनेक प्रश्न गुंडाळले. वाद सुरू आहे की मिटला, असे विचारल्यावर ‘इफ्फी आणि बरेच काही सुरू आहे’, असे मिश्कील उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेली.

लक्ष दिल्‍लीकडे

दिल्लीत येत्या रविवारी राज्यातील एकंदरीत घडामोडींविषयी गृहमंत्री अमित शहा बैठक घेणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता तानावडे म्हणाले की, सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होणार असल्याने रविवारी मी दिल्लीत आहे. उद्या सदस्यत्व आढावा बैठकीसाठी दामोदर नाईक, केशव प्रभू, प्रेमानंद म्हांबरे यांच्यासह दिल्लीला जाणार आहेत.

तानावडे : गाभा समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती बाहेर फुटू नये, यासाठी मोठी काळजी घेण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनीही ‘होय नोकऱ्यांच्या चोरबाजारप्रकरणी चर्चा झाली’ या पलीकडे जास्त माहिती देण्यास नकार दिला.

कामत : आमदार दिगंबर कामत यांनी बैठकीनंतर सांगितले की, ती सर्वसाधारण बैठक होती. तेथे संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली. नोकऱ्यांच्या घोटाळ्यासंदर्भात चर्चा झाली का, असे विचारल्यावर त्यांनी ‘प्रदेशाध्यक्षांना विचारा, त्या प्रकरणांचा तपास सुरू आहे’ असे उत्तर दिले.

तवडकर : सभापती रमेश तवडकर यांनी ‘संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली आणि प्रदेशाध्यक्ष माहिती देतील’, असे सांगून तेथून निघून जाणे पसंत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT