IFFI 2024: 'जे तडजोड करतात ते...' कास्टिंग काउचवर इम्तियाज अली स्पष्टच बोलले

Manish Jadhav

गोवा

गोव्यात सध्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची धूम पाहायला मिळत आहे. बॉलिवूडसह टॉलिवूडमधील दिग्दर्शकांसह कालाकारांनी हजेरी लावली आहे.

bollywood Director imtiaz ali | IFFI

बॉलिवूड दिग्दर्शक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अलीही फिल्म फेस्टिव्हलसाठी गोव्यात आले आहेत. यावेळी त्यांना कास्टिंग काउचबाबत प्रश्न विचारण्यात आला.

bollywood Director imtiaz ali | IFFI

कास्टिंग काउच

चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अनेक दिग्दर्शक आणि कलाकारांवर कास्टिंग काउचचे आरोप झाले आहेत. काही दिवसांपूर्वी, मल्याळम चित्रपटसृष्टीतही हा मुद्दा तापला होता.

bollywood Director imtiaz ali | IFFI

काय म्हणाले अली?

मी गेली 15-20 वर्षांपासून दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. कास्टिंग काउचबद्दल मीही खूप ऐकलं आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे अभिनेत्री बनण्यासाठी आलेल्या मुलींना तडजोड करावी लागते. पण मी तुम्हाला सांगू का, तुमच्या म्हणण्याप्रमाणे एखादी मुलीने तडजोड जरी केली तरी तिला चित्रपटात रोल मिळेलच असं काही नाही.

bollywood Director imtiaz ali | IFFI

इज्जत

अली पुढे म्हणाले की, जो व्यक्ती स्व:ताची इज्जत करतो, पुढचा व्यक्तीही त्याची इज्जत करतो.

bollywood Director imtiaz ali | IFFI

करिअरशी तडजोड

अली शेवटी म्हणाले की, तुम्ही तडजोड केली तर फिल्म इंडस्ट्रीत तुम्हाला अधिक संधी मिळतील हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी अगदी या तर्काच्या उलट पाहिले आहे. जे तडजोड करतात ते त्यांच्या करिअरशी तडजोड करतात.

bollywood Director imtiaz ali | IFFI
आणखी बघा