Jagat Prakash Nadda Visit Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: जे पी नड्डा यांचे दाबोळी विमानतळावर जंगी स्वागत

Dhananjay Patil

दाबोळी : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (Bjp Leader J P Nadda) यांचे शनिवारी दाबोळी विमानतळावर (Dabolim Airport) दुपारी आगमन झाले. त्यांचे यावेळी ढोल-ताशांच्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांच्या (Bjp Workers) उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले. नड्डा विमानतळावरून बाहेर येताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. (Goa Police) नड्डा यांनी वाहनात बसण्यापूर्वी कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन केले. कार्यकर्त्यांचा जोश पाहून त्यांची भेट घेणे टाळता आले नाही. त्यांनी गाडीतून उतरून थेट महिला कार्यकर्त्यांकडे जाऊन भेट घेतली व हात जोडून नमस्कार केला. नंतर ते पणजीला (Panajim) रवाना झाले. राष्ट्रीय अध्यक्ष या दौऱ्यात निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना कोणता मंत्र देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, (Dr Pramod Sawant) प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, (Sadanand Shet Tanavade) पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, (Mauvin Gudhino) नगरविकास मंत्री मिलिंद नाईक, (Milind Naik) केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, (Shripad Naik) माजी आमदार दामोदर नाईक, (Damodar Naik) माजी खासदार नरेंद्र सावईकर, (Narendra Sawaikar) नगराध्यक्ष दामोदर कासकर, (Damodar Kaskar) नगरसेवक दामोदर नाईक, (Damodar Naik) दीपक नाईक, (Dipak Mayekar) प्रजय मयेकर, (Prajay Mayekar) अमय चोपडेकर (Amay Chopdekar) उपस्थित होते.

नड्डा (j P Nadda) हे रविवार, दि. २५ रोजी सकाळी साडेआठ वाजता मंगेशी (Mangeshi) येथे श्री मंगेशाचे (God Mangesh) दर्शन घेणार आहेत. (Goa) त्यानंतर ९.१५ वाजता ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी (Brahmeshanandacharya Swami) यांच्यासमवेत कुंडई (Kundai) येथे तपोभूमीत (Tapobhumi) वृक्षारोपण (Tree Plantetion) कार्यक्रमात भाग घेणार आहेत. साडेदहा वाजता पणजी (Panajim) येथे डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये (Don Bosco High School) लसीकरण केंद्राला भेट देणार आहेत. दुपारी विवांता हॉटेलमध्ये (Hotel Vivanta) पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेनंतर संध्याकाळी साडेचार वाजता ते दाबोळी विमानतळावरून (Dabolim Airport) दिल्लीला (Delhi) रवाना होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr Pramod Sawant) म्हणाले, जे.पी. नड्डा यांच्या आगमनाने गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांची उमेद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी आम्ही सुरू केली आहे. नड्डा यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी दाबोळी विमानतळावर केलेली गर्दी, हे सांगते की भाजपवर लोकांचे नितांत प्रेम आहे. त्यामुळे २०२२ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपचे सरकार बहुमताने सत्तेवर येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT