भाजप पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भाजपला बंडखोरांची धास्ती

भाजपचे (Goa BJP) स्थानिक नेते उठताबसता स्वबळाची भाषा करत असले, तरी मगोला (MGP) सोबत न घेतल्यास राजकीय दगाफटका होण्याची शक्यता दिल्लीतील नेत्यांच्या लक्षात आली आहे.

Avit Bagle

पणजी: काही नेत्यांची अतिमहत्त्वाकांक्षा आणि संभाव्य बंडखोरी यामुळे सत्ताधारी भाजप (Goa BJP) अडचणीत येऊ नये यासाठी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना वारंवार गोव्यात यावे लागत आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव बी. एल. संतोष यांच्या पाठाेपाठ आता पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P Nadda) गोव्यात येत आहेत. नड्डा यांचा हा नियमित दौरा असल्याचे सांगितले जात असले, तरी संतोष यांनी दिलेल्या अहवालानंतरच या भेटीचे नियोजन झाल्याची माहिती मिळाली आहे. निवडणुकीला सामोरे जाताना भाजपसमोर अनेक पर्याय असल्याचे स्थानिक पातळीवरून दिल्लीतील नेत्यांना सांगण्यात येत असले, तरी संतोष यांनी केलेले विश्लेषण याला छेद देणारे होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. (BJP leader is likely to leave the party in Goa)

भाजपचे स्थानिक नेते उठताबसता स्वबळाची भाषा करत असले, तरी मगोला सोबत न घेतल्यास राजकीय दगाफटका होण्याची शक्यता दिल्लीतील नेत्यांच्या लक्षात आली आहे. इतर पक्षातून आलेले आमदार निवडणुकीच्या तोंडावर निघून गेले, तर काय? उमेदवारीवरून पक्षांतर्गत बंडाळी झाली तर काय? असे प्रश्न वरिष्ठांकडून विचारले गेल्यावर पर्याय तयार आहे असे ठराविक साच्याचे उत्तर स्थानिक पातळीवरून देण्यात येत होते. संतोष यांच्या मागील दौऱ्यावेळी हा पर्याय कितपत सक्षम आहे याची चाचपणी करण्यात आली.

निवडणूक तयारीचा घेणार आढावा

विधानसभा निवडणूक 7 महिन्यांवर आली आहे. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाने प्रदेश पातळीवर किती तयारी केली आहे याचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे 12 व 13 रोजी गोव्यात अनेक बैठका घेतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्यासोबत राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष हेही असतील. राज्य प्रभारी सी. टी. रवी आजच राज्यात दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर होते. जे. पी. नड्डा 12 व 13 रोजी आमदार, मंत्री, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा संघटनात्मक कार्याचे डोस देणार आहेत.

निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांचा हा दौरा आहे. ते दोन दिवसात पक्षाचे विविध विभाग, आमदार, मंत्री, विधीमंडळ गटाची एकत्रित, गाभा समिती, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, मंडळ प्रभारी, माध्यम व समाजमाध्यम विभाग यांच्या स्वतंत्र बैठका घेणार असल्याची माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT