BJP Dainik Gomantak
गोवा

निर्बंधांमुळे भाजपचा घरोघरी जाऊन प्रचार; विरोधी पक्षांची रणनीती काय?

मागील काही दिवसात अनेक मोठे नेते गोव्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार करत आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात कोविड प्रकरणांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून 26 जानेवारीपर्यंत सार्वजनिक मेळाव्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्णयाचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर होणार आहे. (BJP is doing door to door campaign. What is the election strategy of other parties)

निवडणूक तोंडावर असताना घेण्यात आलेला हा निर्णय भाजपची (BJP) राजकीय खेळी तर नाही ना, असा प्रश्न देखील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. मागील काही दिवसात अनेक मोठे नेते गोव्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार करत आहेत. यामध्ये प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचा देखील समावेश आहे. या निर्बंधाच्या काळात देखील निवडणूक प्रचार सुरू ठेवण्यासाठी भाजपने घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा मार्ग अवलंबला आहे. ही योजना राबवण्यात येणार असल्याचे सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सांगितले की, "राज्य 26 जानेवारीपर्यंत सार्वजनिक मेळाव्यावर निर्बंध लादणार आहे. बंद जागेतील कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त लोकांना (किंवा कमाल 50% क्षमता) व खुल्या जागेत 100 पेक्षा जास्त लोकांना सहभागी होण्यास परवानगी दिली जाणार नाही. सरकारच्या लक्षात आले आहे की कोविडचा प्रसार प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणी होतो. बाजारपेठ आणि समुद्रकिनाऱ्यांवर कोणत्याही वेळी 100 पेक्षा जास्त लोक नसतील याची पोलिस काळजी घेतील. 26 जानेवारी नंतर राज्य सरकार परिस्थितीचा आढावा घेईल आणि पुढील निर्णय घेईल.”

भाजपच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या योजनेला मतदार कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उर्वरीत पक्ष निर्बंधांचे पालन करून प्रचार कसा करतात, हे बघण्यास मतदार उत्सुक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT