Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: 'राज्य सरकार बहुजनविरोधी, 2027 निवडणुकीत भाजपचा होणार दारूण पराभव'; LOP आलेमाव यांचा घणाघात

Goa Politics: . हे सरकार बहुजनांच्या विरोधात असून सर्व टप्प्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार सपशेल अपयशी ठरणार असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

Sameer Panditrao

वास्को: २०२७ मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला दारूण पराभवाचा सामना करावा लागणार आहे. हे सरकार बहुजनांच्या विरोधात असून सर्व टप्प्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार सपशेल अपयशी ठरणार असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

दाबोळी - वाडे येथील फ्लोरा ग्रॅड सभागृहात गोवा प्रदेश काँग्रेस समिती तर्फे ‘संविधान बचाव अभियान’ मुरगाव तालुक्यात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव बोलत होते.

यावेळी गोवा काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे, सह सल्लागार डॉ. अंजली निंबाळकर, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोवा खासदार कॅप्टन.विरियातो फर्नांडिस, दक्षिण गोवा काँग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा, गोवा काँग्रेस महिला उपाध्यक्ष स्नेहा फोंडेकर, गोवा काँग्रेस इतर मागास वर्गीय समितीचे अध्यक्ष नितिन चोपडेकर, गोवा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख नियाजी शेख, मुरगावचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत, नगरसेविका प्रिया राऊत, मुरगाव काँग्रेस गटाध्यक्ष साईश आमेरकर,वास्को गटाध्यक्ष सिध्देश कलंगुटकर, दाबोळी गटाध्यक्ष वसंत नाईक, कुठ्ठाळी काँग्रेस गटाध्यक्ष पिटर डिसोझा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

माणिकराव ठाकरे, गोवा काँग्रेस प्रभारी

काँग्रेस पक्षाने संविधान बचावासाठी प्रत्येक तालुक्यातील मतदारसंघात अभियान सुरू केले आहे. यात आम्ही जनतेच्या समस्या जाणून घेऊन, त्या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात गोवा विधानसभेबरोबर लोकसभेत मांडणार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT