Goa MLA Couples
Goa MLA Couples Dainik Gomantak
गोवा

Goa MLA Couples : गोव्यात एकाच पक्षात तीन आमदार दाम्पत्ये

गोमन्तक डिजिटल टीम

Goa MLA Couples : भाजपाने मायकल व दिलायला या लोबो दाम्पत्याला विधानसभेची उमेदवारी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे दोघांनी काँग्रेसमध्ये उडी घेत कळंगुट आणि शिवोलीत काँग्रेसकडून आमदारकी गळ्यात घातली गेली. आठ महिन्यांच्या कालावधीनंतर या दाम्पत्याने भाजपात प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपात आता तीन पती-पत्नी आमदारांच्या जोड्या झाल्या आहेत.

वाळपईचे आमदार विश्वजित राणे यांच्याकडे आरोग्य व नगर नियोजन मंत्रिपद आहे, तर त्यांच्या पत्नी डॉ. दिव्या राणे या पर्येच्या आमदार आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याकडे महसूल व कचरा व्यवस्थापन अशी मंत्रिपदे आहेत, तर त्यांच्या पत्नी तथा ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्याकडे उत्तर गोवा पीडीएची जबाबदारी आहे. दोन्ही पत्नी आमदारांचे पती मंत्री झाल्याने आता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या लोबो दाम्पत्यापैकी मायकल यांना बदलल्या जाणाऱ्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळणार का? असा प्रश्‍न भाजपच्या गोटातच उपस्थित होत आहे.

मायकल लोबो यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पर्राच्या तत्कालीन सरपंचपद भूषविणाऱ्या तथा पत्नी दिलायला यांना उमेदवारी द्यावी, म्हणून मागणी केली होती. परंतु भाजपमध्ये घराणेशाही चालणार नाही, असे सांगत तेथील उमेदवारी भाजपने माजी मंत्री तथा आमदार दयानंद मांद्रेकरांना दिली. मायकल लोबो यांनी दिलायला यांना निवडून आणण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आणि त्याचा परिणाम त्या निवडूनही आल्या.

पाच जणांचा गट

काँग्रेसमध्ये गेल्यानंतर दिलायला यांना उमेदवारी देण्यामागे अर्थव्यवहार झाल्याची कुजबुज काँग्रेसच्या गोटात सुरू होती. त्याशिवाय विरोधी पक्षनेतेपद असलेल्या लोबो यांच्या विरोधात नगरनियोजन मंत्र्यांनी मोहीम उघडल्याने मायकल यांना आपले पंख काटले जात असल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीवेळी आणि अधिवेशनावेळी सौम्य भूमिका घेतली आणि आपला पाच आमदारांचा गट तयार केला. त्यांनी विधानसभेत साळगाव, कळंगुटस आणि शिवोलीत आपले प्राबल्य असल्याचे दाखविले आहे. त्यामुळे वाळपईच्या मंत्र्यांना हा मोठा शह असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी लोबो यांच्यावर किती विश्‍वास टाकतात, हे काही आठवड्यांनी लक्षात येईलच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT