दाबोळी: मगो पक्षाने भाजपला 1999 पासून पाठिंबा दिलेला असताना सुद्धा या पक्षाने सदैव आमच्यावर अन्याय केला असल्याची माहिती मगो पक्षाचे नेते सुदीन ढवळीकर यांनी दिली. तीन वेळा राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला (BJP) पाठिंबा दिला तो एका व्यक्तीच्या प्रामाणिकपणामुळे, ते म्हणजे स्वर्गीय मनोहर पर्रीकर.(Manohar Parrikar). सध्याच्या राजकीय घडामोडीत पुन्हा भाजपला पाठिंबा म्हणजे एका प्रकारे आत्महत्या असल्यासारखी प्रतिक्रिया सुदिन ढवळीकर यांनी दिली.
दाबोळी विमानतळावर (airport) रविवार रोजी मुंबईहुन आले असता वरील माहिती मगो पक्षाचे नेते सुदीन ढवळीकर यांनी दिली. राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्याने अनेक पक्षांनी मतदारांच्या गाठीभेटी बरोबर राष्ट्रीय प्रादेशिक पक्षाबरोबर युतीची बोलणी सुरू केली आहे. मगो पक्षाचे नेते तथा मडकईचे आमदार (MLA) सुदिन ढवळीकर यांनी येणारी विधानसभा निवडणूक युती करणार की नाही याविषयी माहिती देताना सांगितले की 1999 पासून राज्यात पक्षाने भाजपला तीन वेळेला पाठिंबा दिलेला आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या प्रामाणिकपणामुळेच मगो पक्षाने
तीन वेळेला सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला साथ दिली होती. आज पर्रीकर हयात नाही पण राज्य भाजपचे विद्यमान खजिनदार संजीव देसाई आहे. कारण पर्रीकर व देसाई यांच्या उपस्थितीत मगो पक्षाने भाजपला पाठिंबा दिला होता. पण भाजपने सदैव आमच्या पाठीत खंजीर खुपसला असून आम्हाला धोका दिला असल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली. राज्य भाजपला नेणारी येणारी विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देणे म्हणजे एका प्रकारे आत्महत्या असल्यासारखी प्रतिक्रिया ढवळीकर यांनी दिली.
पुढील वर्षी गोव्यात येणारे विधानसभा (Assembly) निवडणुकीत मगो पक्ष तर 12 शिक्षित युवकांना उमेदवारी देणार आहे. यात डॉक्टर, अभियंते असून त्यांना गोव्यातील जनता अवश्य कौल देणार असल्याची माहितीही ढवळीकर यांनी दिली. पक्षाने गोव्यात 17 वर्षे राज्य करून सामान्य जनतेला जगण्याचा हक्क प्रदान केला असल्याने गोव्यात मगो पक्षाला यश अवश्य प्राप्त होणार असल्याची माहिती शेवटी ढवळीकर यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.