Goa
Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : जनतेच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष; कुठ्ठाळीच्या जाहीर सभेत युरी आलेमांव यांचे भाजपवर टीकास्त्र

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

कुठ्ठाळी, भाजप सरकारकडून जनतेच्या विविध प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले जात आहे, ते प्रश्न मांडण्यासाठी योग्य नेत्याची गरज असून ‘इंडिया’आघाडीचा उमेदवार कॅ.विरियातो फर्नांडिस यांना लोकसभेत पाठवण्याची संधी मतदारांना लाभली आहे.

मतदारांनी मताधिकाराचा योग्य वापर करून संविधान अबाधित राखण्यासाठी विरियातो यांना विजयी करावे, असे आवाहन विरोधी पक्ष नेते युरी आलेमांव यांनी केले.

कुठठाळी येथील सालिवरा हॉल मध्ये सायंकाळी ७ वाजता काँग्रेसच्या झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.ते म्हणाले स्व.माथानी साल्ढाणांसारख्या नेत्याने राज्यातील अनेक जनविरोधी प्रकल्पांविरोधात आंदोलने छेडली, लोकांनी विरोध दर्शवल्यानंतर सरकारला ते प्रकल्प बंद करण्यास भाग पाडले होते.

यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे उमेदवार कॅ.विरियातो फर्नांडिस, आमदार व्हेंझी व्हिएगस, आमदार एल्टन डिकॉस्टा,माजी मंत्री एलिना साल्ढाणा,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण अध्यक्ष सावियो डिसिल्वा, काँग्रेसचे जोसेफ वाझ,फेलिझा रापोझ,

मावरेलियो कार्व्हालो,महिला अध्यक्ष बीना नाईक, लुपिन झेवियर, वेलांसियो सिमोईश, जिल्हा पं.सदस्य मिशेल रिबेलो,मोरेनो रिबेलो,रोजिता,सरपंच वेळसांव डायना,नितीन चोपडेकर,रापणकार संघटनेचे अध्यक्ष आग्नेल फर्नांडिस,सांकवाळचे माजी जिल्हा पं.सदस्य वसंत नाईक, कुठ्ठाळीचे माजी सरपंच ॲंथनी फर्नांडिस व ओरविल यावेळी उपस्थित होते.

आमदार एल्टन डिकोस्टा म्हणाले की, काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस व विरोधी उमेदवार यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असून सर्वांनी खंबीरपणे काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनार्थ एकजुटीने मतदान करून विजयी करावे.

आमदार व्हेंझी व्हिएगस म्हणाले की, भाजपा सरकारच्या राजवटीत जी हुकूमशाही चालली आहे. त्याविरूद्ध लढा देण्यासाठी सगळे पक्ष एकत्रित आले असून सर्वांनी एकमताने मतदान करून आमच्या उमेदवाराला निवडून द्यावे, कारण भविष्यात मतदान करण्याची ही संधी परत मिळणार नाही. वाढत चाललेल्या महागाईविरोधात आपला राग व्यक्त करा.

यावेळी जोझफ वाझ, समाजसेविका तारा केरकर,महिला अध्यक्ष बीना नाईक,मावरेलियो कार्व्हालो,नियाझ, काशिनाथ यादव यांचीही भाषणे झाली. सावियो डिसिल्वा यांनी आभार मानले.

वाढते गुन्हे; कायदा सुव्यवस्था कोलमडली !

कॅ.विरीयातो फर्नांडिस यांनी सांगितले की, सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात खून ,बलात्कार, दिवसा ढवळ्या चोऱ्या होत आहेत.

आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवणाऱ्यांवर सध्या अन्याय होत आहे. सरकारने दिलेली अनेक आश्वासने फोल ठरलेली आहेत.तेव्हा आता वेळ आलेली असून भारतीय संविधानावर होत असलेला हल्ला परतवून लावण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT