NCP support to Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा

भाजप गोत्यात, राष्ट्रवादीचाही उत्पल पर्रिकरांना पाठिंबा?

राजकीय वर्तुळात उत्पल पर्रिकर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत

दैनिक गोमन्तक

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. या सगळ्यात पणजी मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. याच कारण म्हणजे पणजी (Panaji) मतदारसंघातून भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला भाजपने तिकीट नाकारले आहे. यानंतर उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर त्यांना शिवसेनेने आपला पाठिंबा देत आपला उमेदवार मागे घेतला आहे.

दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उत्पल पर्रिकर यांना पाठिंबा मिळणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पणजीत उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना पाठिंबा देणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. तसेच उत्पल पर्रिकर यांना पाठिंबा देण्यासाठी स्थानिक नेते आणि राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील अस मत नवाब मलिक यांनी व्यक्त केल आहे. उत्पल पर्रिकर यांना काँग्रेस व आप वगळता भाजपविरोधी प्रत्येक पक्षाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता राजकीय जाणकार मांडत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्पल पर्रिकर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT