CM Pramod Sawant, Damu Naik  X
गोवा

Goa BJP State President: भाजपतर्फे 'भंडारी कार्ड', दामू नाईकच होणार गोव्याचे प्रदेशाध्यक्ष

Goa BJP State President: भाजपने इतर मागासवर्गीयांत सर्वांत मोठा समाज असलेल्या भंडारी समाजाला थेट प्रदेशाध्यक्षपदी प्रतिनिधित्व देत माजी आमदार दामोदर ऊर्फ दामू नाईक यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली.

Sameer Panditrao

Goa BJP State President Declaration

पणजी: भाजपने इतर मागासवर्गीयांत सर्वांत मोठा समाज असलेल्या भंडारी समाजाला थेट प्रदेशाध्यक्षपदी प्रतिनिधित्व देत माजी आमदार दामोदर ऊर्फ दामू नाईक यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली.

त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्ष निवडणुकीसाठीचे निवडणूक अधिकारी सुनील बन्सल उद्या (ता. १८) सकाळी ११ वाजता गोमंतक मराठा समाज सभागृहात होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात करणार आहेत. नाईक यांची या पदावर निवड होणार, याचे वृत्त सर्वप्रथम ‘गोमन्तक’ने सोमवार, १३ जानेवारी रोजी दिले होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी प्रदेश सरचिटणीस दामोदर ऊर्फ दामू नाईक यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्यातच जमा आहे. भाजपच्या येथील कार्यालयात झालेल्या पाच मिनिटांच्या गाभा समितीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्ष निवडणुकीसाठीचे निवडणूक अधिकारी सुनील बन्सल यांनी दामू नाईक यांचे नाव पक्षश्रेष्ठींनी निश्चित केल्याची माहिती दिली. ही बैठक आटोपल्यावर नाईक यांनी उमेदवारीचे दोन अर्ज सादर केले.

स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असताना भंडारी समाजाचे सर्वाधिक मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात होते. त्यानंतर ही संख्या रोडावत गेली. आता सुभाष शिरोडकर, रवी नाईक हे दोनच मंत्री नाईक हे प्रदेश सरचिटणीसपदी होते. त्यांच्यासोबतीने त्याच पदावर काम करणारे ॲड. नरेंद्र सावईकर हेही या पदासाठी इच्छूक होते. मात्र, पुढील निवडणुकांमधील राजकीय समीकरणांचा विचार करता भंडारी समाजाचा नेता प्रदेशाध्यक्षपदी असावा, असा विचार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आणि नाईक यांच्या नावावर दिल्लीतील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

गोमंतक भंडारी समाज संस्थेतील वाद, हरवळेतील श्री देव रूद्रेश्वराची रथयात्रा, कृषिमंत्री रवी नाईक यांनी भंडारी समाज एकीकरणासाठी चालविलेले प्रयत्न, या साऱ्यांची दखल भाजपने घेतली आहे. राजकीयदृष्ट्या हा समाज आता जागृत, सजग होत असल्याचे भाजपच्या नजरेतून सुटले नाही. त्यामुळे दामू यांची निवड या पदावर भाजपला करावी लागणार, याचा अंदाज येत होता. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, दामू नाईक, आमदार दिगंबर कामत, प्रदेश खजिनदार संजीव देसाई, गोविंद पर्वतकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर, प्रदेश उपाध्यक्ष दत्ता खोलकर, आमदार नीलेश काब्राल, माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो आणि मान्यवर उपस्थित होते.

जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना सोबत नेणार

प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे निश्चित झाल्यावर नाईक म्हणाले, जगातील सर्वांत मोठ्या पक्षाचा माझ्यासारखा साधा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष होणे, हा माझ्यासाठी आनंददायी क्षण आहे. जुने व नवे कार्यकर्ते यांना सोबत घेऊन पुढे जाणार. राज्याची उभारणी करणारे कार्यकर्ते घडविणे, हीच पक्षाची प्राथमिक जबाबदारी असते.

मडकई मतदारसंघातून दामूंसाठी ४० फुटी पुष्पहार

दामू नाईक यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने मडकई मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते हर्षभरित झाले आहेत. कारण दामू नाईक हे मूळ मडकई मतदारसंघातील आडपई गावचे. दामू यांची जन्मभूमी आडपई असली तरी फातोर्डा ही कर्मभूमी आहे. दामू यांनी आडपईशीही आपले नाते टिकवून ठेवले आहे. त्यामुळेच आडपई अर्थात मडकई मतदारसंघातील रहिवाशांशी दामूंचे नाते घट्ट आहे. राज्यात ४० मतदारसंघ असल्याने तब्बल ४० फुटी पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन करण्याचे निश्‍चित केले आहे.

सर्वांत आधी ‘गोमन्तक’ने प्रसिद्ध केले होते वृत्त

भाजप प्रदेशाध्यक्षपदी दामू नाईक यांनी निवड होईल, यासंदर्भातील वृत्त सर्वांत आधी ‘गोमन्तक’ने सोमवार, १३ जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते.

...म्हणून दामूंची बिनविरोध निवड

बन्सल यांनी सांगितले, की मतदान केंद्र प्रमुखापासून राष्ट्रीय अध्यक्षापर्यंतच्या निवडी या कार्यकर्त्यांशी चर्चा करून केल्या जातात. त्यामुळेच त्या बिनविरोध होतात. प्रदेशाध्यक्षपदी कोण असावे, याची चर्चाही प्रदेश पातळीवर करण्यात आली होती. आता दामोदर नाईक यांचाच अर्ज या पदासाठी आला आहे. त्यांचीही या पदावर बिनविरोध निवड झाल्याची घोषणा उद्या करण्यात येणार आहे.

नाईक यांच्या निवडीमुळे एका सच्च्या कार्यकर्त्याचा सन्मान झाला आहे. ‘भाजयुमो’चे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय होती. प्रदेश सरचिटणीस या नात्याने राज्यभरात पक्षाचे काम केल्याची पावती त्यांना मिळाली आहे. सातत्याने पक्षाने दिलेले काम त्यांनी यशस्वी केले आहे.
ॲड. नरेंद्र सावईकर, प्रदेश सरचिटणीस.
दामू नाईक यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली, ही भंडारी समाजासाठी अभिमानाची बाब आहे. मुख्यमंत्री आणि प्रदेश पातळीवरील नेते, केंद्रातील नेत्यांनी भंडारी समाजाची दखल घेतली. दामू आमचे असले तरी ते सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत. त्यामुळे ते केवळ भंडारी समाजाचे नेते, असे आता म्हणता येणार नाही.
देवानंद नाईक, अध्यक्ष, गोमंतक भंडारी समाज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात रणशिंग! ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय बहिष्काराचा एल्गार

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

SCROLL FOR NEXT