Mahadayi Water Dispute | Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भाजपाचे थांबा व पहा!

म्हादईसाठी सोमवारी विर्डी-साखळी येथे आयोजित सभेला लोकांकडून मोठा प्रतिसाद लाभला, या सभेच्या प्रतिसादामुळे भाजपवाले धास्तावले वगैरे आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: म्हादईसाठी सोमवारी विर्डी-साखळी येथे आयोजित सभेला लोकांकडून मोठा प्रतिसाद लाभला. विशेषतः दक्षिण गोव्याच्या सासष्टीतून लोकांची जी उपस्थिती लाभली, ती अनेकांच्या भुवया उंचावणारी होती. (Mahadayi Water Dispute)

पण मिळत असलेले संकेत पहिले, तर या सभेच्या प्रतिसादामुळे भाजपवाले धास्तावले वगैरे आहेत. त्यांचे राज्य, जिल्हा तसेच मंडळ स्तरावरील नेते वगैरे शांत आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे प्रकरण चिघळणार वगैरे काही नाही.त्यापूर्वीच त्यावर तोडगा निघेल.

आता प्रत्यक्षात काय होते, की परिस्थिती शांत करण्याचा हा भाजपाचा डाव ते येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल, असे एकंदर घटनांवर लक्ष ठेवून असलेले म्हणतात.

नुस्ते खायला नक्की येईन!

पाणीपुरवठा करणाऱ्या साबांखाकडून मिळालेल्या प्रश्‍नावरील उत्तरावर आमदार वीरेश बोरकर यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, त्याशिवाय खात्याने जी आकडेवारी दाखविली आहे आणि जो पाण्याच्या तुटवड्याचे प्रमाण दर्शविले आहे, ती आकडेवारी कोणाकडून सरकारने आणली आहे, हे खात्याच्या मंत्र्यांनी स्पष्ट करावे.

सांतआंद्रेचा साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांनी एक दिवस दौरा करावा, म्हणजे कोठे पाणी मिळते, किती पाणी मिळते, हे समजेल. त्याशिवाय तुम्ही आल्यास आपण तुम्हाला भाजीपाव-चाय, तसेच मानशीवरील नुस्ते खाऊ घालतो, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता बोरकर काब्राल कधी येतात, याची वाट पाहणार हे नक्की.

दिसले मढे आणि आले रडे!

प्रसार माध्यमातून गवगवा झाल्यानंतर का होईना, मडगाव नगरपालिका अध्यक्षांनी आपल्या पालिकेच्या गॅरेजला भेट देऊन तेथे विनाकारण सडत ठेवलेल्या वाहनांचे दर्शन घेतले.

तिथे गेल्यावर त्यांना पत्रकारांनी विनावापर ठेवलेली शववाहिका दाखविली असता त्यांनी तिथल्या तिथे ही वाहिका दुरुस्त करून लोकांच्या सेवेसाठी पालिकेसमोर आणून ठेवण्याचे आदेश दिले.

त्यांची ही तत्परता वाखाणण्याजोगी असली तरी एव्हढे दिवस या शववाहिकेकडे कुणाचेही लक्ष कसे गेले नाही? हा प्रश्र्न पडतो. की पत्रकारांनी या शववाहिकेचे सडत असलेले मढे दाखविल्यावर नगराध्यक्षांनाही रडे आले म्हणायचे.

आमदार शेट्ये यांचीही अडचण म्हणायची?

डिचोलीचे अपक्ष आमदार तथा भाजप सरकारला पाठिंबा देणारे डॉ. चंद्रकांत शेट्ये हे पाण्याच्या विषयावरील प्रश्‍न मांडण्यासाठी उभे राहिले. त्यांनी अनेक ठिकाणी असलेल्या पाणी टंचाईवर प्रश्‍न मांडत असतानाच त्यांना सभागृहात सभापती व सरकारी पक्षातील आमदारांनी खाली बसा, अशी सूचना केली.

विरोधी पक्षाचे आमदार विरेश बोरकर यांनी पाण्याच्या प्रश्‍नावर उत्तर मागितले होते, त्यावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभारावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला.

विरोधी आमदाराने उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला जणू आमदार शेट्ये यांचे प्रश्‍न पाठिंबा देणारे असावेत काय? असे वाटल्याने त्यांना खाली बसावे लागले. त्यामुळे अखेर त्यांना प्रश्‍न मांडताच आला नाही.

पालिका ट्रकांचे गौडबंगाल

सर्वोच्च न्यायालयाने बीएस 4 इंजिनांची वाहने मोडीत काढण्याचा निर्णय घेतल्यावर ठरावीक मुदतीत ही वाहने वाहतूक खात्याकडे नोंद करण्यासाठी मुदत दिली होती. मात्र मडगाव पालिकेने या जुन्या प्रकारच्या इंजिनाचे तीन ट्रक मुदत उलटून गेल्याने आता ते पालिकेच्या गळ्यात पडले आहेत.

आता त्या ट्रकांचे रजिस्ट्रेशन करावे, अशी विनंती मडगाव पालिकेने वाहतूक खात्याला केली आहे. पण वाहतूक खाते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन या वाहनांची नोंद करणे मुश्कील. त्यात आता शॅडो काऊन्सिलनेही आपण अशा प्रकाराला हरकत घेणार हे जाहीर केले आहे.

यातील आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे कुठलीही गाडी रजिस्टर केल्याशिवाय शोरूमच्या बाहेर काढता येत नाही. अगदी स्कूटरसुद्धा. मग हे इतके मोठे ट्रक रजिस्टर झाल्याशिवाय पालिकेच्या ताफ्यात आलेच कसे? आहे की नाही काहीतरी गौडबंगाल!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT