Goa BJP VS Congress Dainik Gomantak
गोवा

भाजप विकासासाठी की लुटण्यासाठी? अमरनाथ पणजीकरांचा भाजपवर निशाणा

वाढत्या इंधन दरामुळे गोवेकर त्रस्त; महागाईवरून काँग्रेसची भाजपवर टीका

दैनिक गोमन्तक

Fuel Price Hike : इंधन आणि गॅसच्या वाढत्या किमती आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल गोव्यातील काँग्रेसने बुधवारी भारतीय जनता पक्षावर त्यांच्या 42 व्या स्थापना दिन साजरा करत असताना टिका केली आहे आणि भाजपच्या (BJP) स्थानिक नेतृत्त्वाने महागाई कमी करण्यासाठी प्रधानमंत्र्यांना सांगावे असे निवेदन केले आहे.

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमती कमी करण्याची मागणी केली पाहिजे. तसे केल्यास सिद्ध होईल की भाजपची स्थापना लोकांची सेवा करण्यासाठी झाली होती, लोकांना लुटण्यासाठी नाही, असे काँग्रेस प्रदेश (Congress) समितीचे माध्यम अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले.

गोव्यात पेट्रोलचे दर 60 रुपयांच्या खाली ठेवण्याचे आश्वासन भाजपनेच दिले होते, मात्र काही वर्षांनी ते आश्वासन विसरले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

'डिझेल आणि पेट्रोलचे दर (Petrol-Diesel Price Hike) वाढत असल्याने त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांवर होत आहे. त्याचबरोबर सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत. कुटुंबे त्रस्त आहेत, महिला त्रस्त आहेत. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पातही अर्थखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी (Pramod Sawant) इंधनाच्या दराचा उल्लेख केलेला नाही. शेवटी लोकांना त्रास होत आहे आणि असे असूनही ते स्थापना दिवस साजरा करत आहेत. त्यामुळे भाजपने ते लोकांच्या हितासाठी आहेत की लोकांना लुटण्यासाठी हे आता स्पष्ट करावे, अशी टीका पणजीकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT