Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: महिला सुरक्षेची ‘गॅरंटी’ देण्यात भाजप अपयशी, गोव्यात गुन्हे वाढत असल्याचा काँग्रेसचा आरोप

Goa Congress: भाजप ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ची घोषणा देतात, पण भाजपच्या राजवटीत मुली आणि महिला सुरक्षित नाहीत, असा आरोप नाईक यांनी केला.

Pramod Yadav

Goa Congress

महिलांच्या सुरक्षेची ‘गॅरंटी’ देण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप गोवा महिला प्रदेश काँग्रेसने शुक्रवारी केला.

गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षा बीना नाईक यांनी शुक्रवारी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीवर भाजप सरकारवर टीका केली. यावेळी उपाध्यक्ष डॉ.प्रमोद साळगावकर, सरचिटणीस लिबी मदेरा उपस्थित होत्या.

'भाजप सरकारच्या काळात महिलांवरील गुन्हे वाढत आहेत. भाजपने देशभरातील बलात्कारी आणि गुन्हेगारांना संरक्षण दिले आहे. आपल्या देशात दर सतरा मिनिटाला स्त्रीवर बलात्कार होतो. दररोज तीन महिलांची तस्करी होते आणि हुंड्यासाठी प्रत्येक 84 मिनिटांत एका वधूची हत्या केली जाते. तर, दर महिन्याला 12 महिलांवर ॲसिड हल्ला होतो,' असे बीना नाईक म्हणाल्या.

भाजप ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ची घोषणा देतात, पण भाजपच्या राजवटीत मुली आणि महिला सुरक्षित नाहीत, असा आरोप नाईक यांनी केला.

भाजपचे सर्वाधिक खासदार आणि आमदारांवर महिलांविरोधातील गुन्हे दाखल आहेत. मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या काळात महिलांचे संरक्षण करण्यात भाजप अपयशी ठरले.

गोव्यातही महिलांविरोधात गुन्हे घडत आहेत. त्यामुळे या सरकारला सत्तेतून बाहेर काढले पाहिजे, असे नाईक म्हणाल्या.

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. कायदे असतानाही महिला घरात आणि बाहेरही सुरक्षित नाहीत, असे डॉ. प्रमोद साळगावकर म्हणाल्या.

महिलांसाठी ‘संरक्षण अधिकारी’ नेमण्यात सरकार अपयशी ठरले असून, या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नाही, असे त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT