Divya Rane and Jennifer Monserrate Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या मंत्रिमंडळात महिलांना 'नो एंट्री'?

जेनिफर मोन्सेरात आणि दिव्या राणेंचा भ्रमनिरास, उर्वरित जागांवर मगोप, अपक्षांना संधी

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्र्यांसह 8 कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी सोमवारी सकाळी पार पडला. मात्र या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान भाजपकडून देण्यात आलेलं नाही. 11 पैकी 8 जागांसाठी मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. गोव्याच्या कॅबिनेटमध्ये अजूनही 3 जागा शिल्लक आहेत. मात्र यात मगोप आणि अपक्षांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत वाळपईचे आमदार विश्वजीत राणे, मॉविन गुदिन्हो, फोंड्याचे आमदार रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांच्या नावाचा समावेश आहे. विश्वजीत राणेंना (Vishwajit Rane) दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं पद मिळण्याची शक्यता आहे.

गोव्यात सध्या भाजपच्या (BJP) दोन महिला आमदार आहेत. या दोघीही मंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. यात जेनिफर मोन्सेरात यांनी मागील सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं होतं. मात्र यावेळी त्यांचं मंत्रिपद राहील की जाईल अशी चर्चा सुरु होती. दुसरीकडे विश्वजीत राणेंच्या पत्नी दिव्या राणेंनी राजकीय पदार्पणातच मोठ्या मताधिक्याने पर्ये मतदारसंघातून निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र या दोन्ही महिला आमदारांमधील चुरस पाहता भाजपने दोघींनाही डच्चू दिल्याचं चित्र आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मगोपच्या सुदिन ढवळीकरांसह अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT