Goa BJP Loksabha Candidate Dainik Gomantak
गोवा

Goa BJP Loksabha Candidate: उत्तरेत भाऊ, भाजपने दक्षिण गोव्यातून उमेदवाराची घोषणा का केली नाही?

Goa BJP Loksabha Candidate: उत्तरेत भाऊ, भाजपने दक्षिण गोव्यातून उमेदवाराची घोषणा का केली नाही?

Pramod Yadav

Goa BJP Loksabha Candidate

मागील अनेक दिवसांपासून उत्कंठा वाढवणाऱ्या भाजपच्या उत्तर गोव्यातील उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा झाली आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या 195 उमेदवारांच्या यादीत उत्तर गोव्यातून विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

श्रीपाद नाईक यांना भाजपकडून सलग सहाव्यांदा उमेदवारी मिळाली आहे. भाजपचा उत्तरेतील तिढा सुटला असला तरी दक्षिणेतील पेच कायम आहे.

उत्तर गोव्यातून भाजपच्या वतीने श्रीपाद नाईक यांच्यासह दयानंद सोपटे, दयानंद मांद्रेकर आणि दिलीप परुळेकर यांची नावे दिल्लीत पाठवण्यात आली होती. तर, दक्षिणे गोव्यातून नरेंद्र सावईकर, दिगंबर कामत, रमेश तवडकर, दामू नाईक आणि बाबू कवळेकर यांची नावे पाठविण्यात आली.

मागील दोन ते तीन दिवसांपासून दिल्लीत या नावांवर चर्चा झाली. राज्यात लोकसभेच्या दोनच जागा असल्याने झटपट निर्णयाची अपेक्षा होती.

मात्र, केंद्रीय नेत्यांसोबत झालेल्या विविध बैठकांनंतर पहिल्या यादीत उत्तर गोव्यातील उमेदवाराची घोषणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. याचवेळी पुन्हा एकदा श्रीपाद भाऊ यांनाच संधी दिली जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले.

दरम्यान, आज दिल्लीतून जाहीर करण्यात यातून भाऊच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

दक्षिणेचा तिढा कायम!

भाजपच्या दक्षिण गोव्यातील उमेदवाराची घोषणा दुसऱ्या यादीत केली जाणार आहे. दक्षिणेसाठी पाठवलेल्या नावांपैकी दिगंबर कामत, रमेश तवडकर यांनी माघार घेतल्याने, आता नरेंद्र सावईकर, दामू नाईक आणि बाबू कवळेकर यांची नावे चर्चेत आहेत.

नरेंद्र सावईकर यांना मागील निवडणुकीत (2019) परभाव पत्कारावा लागल्याने भाजप येथे दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्याची शक्यता आहे. यामध्ये सध्या माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या नावाची चर्चा आहे.

दक्षिण गोव्यातून ॲड. नरेंद्र सावईकर यांना पुन्हा जनमत आजमावण्याची संधी भाजप देणार का, याविषयी खुद्द भाजपमध्ये उत्सुकता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावे लागले होते.

यंदा त्यांच्या बरोबरीने भाजपने माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, सभापती रमेश तवडकर, आमदार दिगंबर कामत यांच्या नावाचा विचार सुरू केल्याने सावईकर यांना भाजप विश्रांती देईल, असे मानले जात आहे. दरम्यान, दुसऱ्या यादीत याबाबत भाजप कोणाला संधी देतं हे पाण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Crime: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Film Festival: 'कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या'! CM सावंतांचे आवाहन; राज्य चित्रपट महोत्सवाचा थाटात समारोप

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

SCROLL FOR NEXT