Panchayat Election in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Zilla Panchayat Election : जिल्हा पंचायत पोटनिवडणूक बहुरंगीच

काँग्रेसनंतर भाजपचेही उमेदवार जाहीर; आरजी, आपही रिंगणात

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Zilla Panchayat Election : जिल्हा पंचायतीच्या दवर्ली, रेईश मागूश आणि कुठ्ठाळी मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस, आरजी पाठोपाठ आता भाजपने आपले उमेदवार जाहीर केल्याने ही निवडणूक बहुरंगी होणार, हे स्पष्ट झाले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भाजपच्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली. उत्तर गोव्यातील रेईस-मागुश जिल्हा पंचायतीच्या जागेसाठी पिळर्ण येथील संदीप काशिनाथ बांदोडकर तर दक्षिण गोव्यातील दवर्ली जिल्हा पंचायतीसाठी परेश पांडुरंग नाईक यांच्या नावांचा समावेश आहे.

परेश नाईक पंच सदस्य असून गेली सहा वर्षे ते उपसरपंच पद सांभाळत आहेत. तसेच भाजपाच्या नावेली मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. तर संदीप बांदोडकर गेली चार वेळा पंच सदस्य म्हणून कार्यरत असून त्यांनी सरपंचपदीही काम केले आहे. दुसरीकडे काँग्रेसने दवर्ली येथून लिओनिको रायकर आणि कुठ्ठाळी येथून वॉलेंट बारबोझा यांना तर रेईश मागूश येथून प्रगती पेडणेकर यांना उमेदवारी दिली आहे. आरजी, आपसह इतर राजकीय पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवाय काही अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बहुरंगी होणार, असे संकेत आहेत.

दरम्यान उत्तरेतील रेईस-मागुश आणि दक्षिणेतील दवर्ली या जागा आम्ही यापूर्वी जिंकल्या होत्या. कुठ्ठाळीची जागा अपक्ष आमदार अंतोनियो वाझ यांनी जिंकली होती. त्यामुळे ही जागा आम्ही त्यांच्यासाठी सोडली असून त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. आताही आम्ही या तीनही जागा जिंकू असा मला विश्‍वास आहे, असं गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT