सासष्टी: पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर व माजी उपमुख्यमंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मधला तंटा सोडविलेला आहे. त्यांना समज दिली आहे. काही भाजप आमदारांना ‘प्रसिद्धी स्टंट’ करण्याची सवय जडली आहे, असे सांगून त्यांनी कळंगुटचे आमदार मायकल लोबोंवर निशाणा साधला.
लोबो यांनी ड्रग्ससंदर्भात काही जाहीर विधाने केली. त्या संदर्भात पत्रकारांनी नाईक यांच्याकडे विचारणा केली. मडगाव रवींद्र भवनात दामू नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी वरील भाष्य केले. आमदार वा नेते, कार्यकर्त्यांमध्ये काही मतभेद असतील तर त्यांनी पक्ष चौकटीत राहूनच बाजू मांडावी, असेही ते म्हणाले.
ड्रग्ससंदर्भात किंवा इतर तक्रार असेल तर पोलिसांकडे तक्रार करावी. लोकशाही पद्धत वापरावी, मात्र कायदा हातात घेऊ नये व पत्रकार समोर आले तर काहीही बरळू नये, असेही दामू नाईक यांनी भाजप आमदार अन् नेत्यांना स्पष्टपणे सुनावले.
गोव्यातील प्रादेशिक आराखड्याविरोधात बोलणारे, विजय सरदेसाई यांना विरोध करणारे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस आता त्यांच्या हातात हात घालून वावरत असून ते रंगबदलू राजकारणी आहेत,असा आरोप ‘आरजी’चे अध्यक्ष मनोज परब यांनी केला. ते पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी ‘गोंयचो आवाज’ संघटनेचा वापर केला,असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.