Margao Municipal Council | Camil Barretto  Dainik Gomantak
गोवा

Margao Municipal Council: सोनसोडोचा प्रश्न सोडवता येत नसेल तर राजीनामा द्या; भाजप नगरसेवकाचा नगराध्यक्षांना घरचा आहेर

कार्यक्षम नगरसेवकाच्या हातात पदभार द्या; स्‍वच्‍छता समितीला विश्वासात घेत नसल्‍याचा आरोप

सुशांत कुंकळयेकर

Margao Municipal Council: सोनसोड्यावरील चिखलाची दलदल रस्‍त्‍यावर वारंवार येऊन अपघात घडत आहे. त्या पार्श्वभुमीवर आज, बुधवारी मडगाव पालिकेतील सत्ताधारी भाजप गटातील नगरसेवक आणि पालिकेच्‍या स्‍वच्‍छता समितीचे अध्‍यक्ष कामिल बार्रेटो यांनी या मुद्यावरून नगराध्यक्षांवर टीका केली.

ही स्‍थिती हाताच्‍याबाहेर जाण्‍यास मडगावचे नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर हेच जबाबदार असून त्‍यांना या प्रश्वावर तोडगा काढता येत नसेल तर त्‍यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा द्यावा, असा घरचा आहेर दिला आहे.

यापूर्वी बाणावली येथील शेतात कचरा टाकल्‍यामुळे बाणावलीचे आमदार व्‍हेन्‍झी व्‍हिएगस यांनीही शिरोडकर यांना नगराध्‍यक्ष पदावर पायउतार हाेण्‍याचा सल्‍ला दिला होता.

कचरा भरलेले ट्रक उतरणीवर ठेवल्‍यामुळेच कचर्‍याचे घाण पाणी रस्‍त्‍यावर वाहून आले आणि त्‍यामुळे रस्‍त्‍यावर दलदल निर्माण होऊन कित्‍येक दुचाकीस्‍वार घसरुन खाली पडले. या सार्‍याला नगराध्‍यक्ष शिराेडकर यांनाच जबाबदार धरावे लागेल.

नगरपालिकेचे अध्‍यक्ष या नात्‍याने त्‍यांनी या अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्‍याची गरज होती. मात्र त्‍यात ते पूर्णत: अपयशी ठरले आहेत असा आरोप त्‍यांनी केला.

कालची ही दुर्घटना घडल्‍यानंतर कुडतरीचे आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स हे घटनास्‍थळी धावून आले. मात्र मडगाव नगराध्‍यक्षांना या जागेवर येऊन पाहणी करण्‍याचे सूचले नाही.

वास्‍तविक या अपघातांची माहिती मिळाल्‍यानंतर त्‍यांनी स्‍वत: येऊन या जागेची पाहणी करणे आवश्‍‍यक होते. पण मंगळवारी सोडाच बुधवारीदेखील त्‍यांनी या जागेला भेट दिली नाही. मी स्‍वत: स्‍वच्‍छता समितीचा अध्‍यक्ष आहे.

असे असतानाही सोनसाेड्याबाबत काय निर्णय घेतले जातात, त्‍यापासून मला अंधारात ठेवले जाते. हा बेजबाबदारपणा का केला जातो ते कळत नाही, असेही बार्रेटो म्‍हणाले.

शिराेडकर यांनी नगराध्‍यक्ष पदाचा पदभार सांभाळून पंधरा महिने होत आले आहेत. नगराध्‍यक्ष झाल्‍यानंतर आपण साेनसोड्यावरील समस्‍या सोडवू, असे त्‍यांनी सांगितले होते. मात्र त्‍यांना त्‍यात पूर्णत: अपयश आले आहे.

जर त्‍यांना नगराध्‍यक्षपदाचा भार सोसवत नसेल तर त्‍यांनी त्‍यावरुन पायउतार व्‍हावे आणि दुसर्‍या कार्यक्षम नगरसेवकाच्‍या हाती जबाबदारी द्यावी अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT