Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने भाजपने साधली प्रचाराची संधी

दैनिक गोमन्तक

Goa BJP: अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने अवघे राज्य राममय झाले. यानिमित्ताने भाजपचे नेते-कार्यकर्ते तसेच मंत्र्यांनी जनतेशी संपर्क साधला. यातूनच लोकसभा निवडणुकीचा निम्मा प्रचार भाजपने साधला. भाजपने दिलेले वचन पूर्ण केले, अशी जनमानसात तयार झालेली भावना भाजपचा राज्यातील दोन्ही जागांवर लोकसभा निवडणुकीतील विजय सुकर करणार आहे, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

भाजपने या सोहळ्याची अचूक संधी घेतली. भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात अयोध्येत राममंदिर बांधू, काश्मीरशी संबंधित ३७० कलम रद्द करू, अशी आश्वासने दिली होती. त्यामुळे अयोध्येत राममंदिर झाल्याचे भाजपचे श्रेय कोणीही हिरावून घेऊ शकत नव्हता.

भाजपने सध्या लोकसभा निवडणूक प्रचाराची तयारी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे सध्या दररोज यासंदर्भात विविध घटक आणि पक्षाचे विविध मोर्चे, विभाग यांच्या बैठका घेत आहेत.

प्रचार सुरू असतानाच अयोध्येतील कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या अक्षता वाटप कार्यक्रमात भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. भाजप, विहिंप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आदींची विचारधारा एकच असल्याने एकच कार्यकर्ता या संघटनांचे काम करतो, अशी अनेक उदाहरणे आहेत.

विरोधकांत बेकी

दुसरीकडे विरोधकांच्या तंबूत अद्याप संभ्रमाचेच वातावरण आहे. ‘आप’चे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ ‘आप’ला इंडिया आघाडीने दिल्याचे सांगितल्यानंतर ते पूर्णतः नाकारण्याचे धाडस कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दाखवले. त्यांनी कॉंग्रेस दोन्ही जागांवर लढणार, असे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजप विरोधकांची एकी होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

इंडिया आघाडीला दिरंगाई भोवली

इंडिया आघाडीत रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाला सहभागी करून घेण्यासंदर्भात झालेल्या दिरंगाईमुळे अखेर त्या पक्षाने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. ‘आरजी’कडून उत्तर आणि दक्षिण गोव्यासाठी अनुक्रमे पक्ष प्रमुख मनोज परब आणि रूपर्ट परेरा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती, तरीही इंडिया आघाडीकडून निमंत्रण येईल, अशा या पक्षाच्या धुरिणांची अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली.

विरोधक निष्प्रभ

भाजपने हा विषय इतक्या जोरात लोकांपर्यंत नेला की, त्याचा प्रतिवाद कसा करावा हे न कळल्याने विरोधकही भांबावले. भाजपला या मुद्यावर विरोध करणे म्हणजे जनभावनांचा अपमान करणे ठरेल आणि त्याची जबरदस्त राजकीय किंमत मोजावी लागेल याची भीती वाटल्याने विरोधकांनी गप्प बसणे पसंत केले. त्यांच्यापैकी अनेकांनी अयोध्येतील कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा देणे पसंत केले.नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

...अशी केली आखणी

अयोध्येतील कार्यक्रम हा भाजपचाच आहे, असे जनमानसावर आपसूकपणे ठसवले गेले. त्याच्या जोडीला गावागावांतील मंदिरांना केंद्रस्थानी ठेवून संघटन केले. तेथे विविध कार्यक्रम, प्रतिमा पूजन, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होईल, याचेही नियोजन केले. तेथे मंत्री-आमदार स्वतः उपस्थित राहतील, लोकांत मिसळतील, अशी व्यवस्था केली. त्यामुळे राममय झालेल्या वातावरणाचा राजकीय फायदा भाजपला होणे साहजिक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT