Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

आपसह टीएमसीचे नेते भाजपने विकत घेतलेत; मायकल लोबो

भाजप सरकार घोटाळ्यांनी भरलेले सरकार असल्याचा दावा मायकल लोबो यांनी केला आहे

दैनिक गोमन्तक

कळंगुट : कळंगुट कॉंग्रेसचे उमेदवार मायकल लोबो यांनी भाजपसह आप आणि टीएमसीवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आता निवडणुका जवळ आल्या आहेत, भाजपचे अनेक प्रमुख नेते गोव्यात येत आहेत आणि गोव्यात दुहेरी इंजिन सरकारबद्दल वारंवार विधाने करत आहेत, जे गोव्याला पुढे नेतील गोव्याचा विकास करतील अस ठणकावून सांगत आहेत. आणि कॉंग्रेसवर आरोप करत आहेत. यावरून मायकल लोबो यांनी भाजपसह आप आणि टीएमसीचा खरपूस समाचार घेतला आहे.

दिल्लीतून आप आणि बंगालमधून टीएमसी ही दोन इंजिने भाजपने (BJP) आणली आहेत. आणि ती भाजपला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच आप आणि टीएमसी (TMC) गोव्यातील मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने त्यांचे नेते विकत घेतले आहेत. या दोन्ही पक्षांनी काँग्रेसची (Congress) मते फोडली आहेत. आणि भाजपला जिंकवण्यासाठी मदत करत आहेत. गोव्यातील लोकांनी याची जाणीव ठेवली पाहिजे.

भाजप सरकार घोटाळ्यांनी भरलेले असल्याचा दावाही त्यांनी केला. “पीडब्ल्यूडी नोकऱ्यांचा घोटाळा बाहेर आला आहे. त्यांनी पळसकर यांना भाजपचे तिकीट का दिले नाही? कारण पैसे कोणी घेतले ते उघड झाले होते. हे दुहेरी इंजिन सरकार गोव्याच्या विकासाबाबत अपयशी ठरले आहे. अस मत मायकल लोबो (Michael Lobo) यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT