Goa BJP And Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: लोकसभेआधीच चकमक; भाजप आक्रमक समाजमाध्यमांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Goa Politics: भाजपने कॉंग्रेसवर समाज माध्यमांवर तुटून पडत याची सुरवात केल्यानंतर कॉंग्रेसने त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्याआधीच भाजप आणि कॉंग्रेसची शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. भाजपने कॉंग्रेसवर समाज माध्यमांवर तुटून पडत याची सुरवात केल्यानंतर कॉंग्रेसने त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

असे करताना त्यांनी भाजपच्या राष्ट्रभक्तीचे बोचकारे काढले आहेत. या साऱ्याची सुरवात प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याने झाली. कॉंग्रेसचे पणजीत मुख्यालय आहे.

त्यांच्या पद्धतीनुसार एका सदनिकेतील या कार्यालयाला ‘कॉंग्रेस हाउस’ असे संबोधले जाते. फेरीबोट धक्क्यासमोरील इमारतीत हे कार्यालय असून पुढील मोकळ्या जागेत कॉंग्रेसकडून राष्ट्रीय सणादिवशी ध्वजारोहण केले जाते.

शुक्रवारी प्रजासत्ताकदिनी कॉंग्रेसने झेंडा फडकावला होता. मात्र, असे करताना कार्यालयावर नेहमी फडकत असलेला पक्षाचा झेंडा उंचावरच ठेवण्यात आला होता.

ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाच्या उंचीच्या वर अन्य ध्वज फडकावता येत नाही. याचा आधार घेत आधी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून, नंतर माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, कार्यकर्ते आणि अखेरीस खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून कॉंग्रेसच्या या चुकीची खिल्ली उडवण्यात आली. कॉंग्रेसला देशासाठी गांधी परिवार मोठा आहे अशा उपरोधिक शब्दांत समाज माध्यमांवर कॉंग्रेसला फटकारले.

या विषयावरून काँग्रेसने आक्रमक होत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एका कार्यक्रमात ध्वजारोहण करण्याऐवजी ध्वज खाली उतरवत असलेला व्हिडिओ कॉंग्रेसच्या माध्यम संवाद विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी सार्वत्रिक केला आहे. आमची चूक झाली त्याबद्दल क्षमस्व, पण शहा चुकले तेव्हा दिलगिरी तरी व्यक्त केली का? असे विचारण्यासही ते विसरलेले नाहीत.

शहा यांचा तिरंग्याऐवजी भगव्या झेंड्यावर अधिक विश्वास असावा असा टोला कॉंग्रेसचे समाजमाध्यम प्रमुख दिव्यकुमार यांनी लगावला आहे. कॉंग्रेसचे समाज माध्यम समन्वयक ग्लेन लॅसेर्डा यांनीही भाजपकडे ध्वजवंदनेचा पुरावा मागितला आहे.

कॉंग्रेसच्या उमेदवार छाननी समितीने राज्यात आपले काम सुरू केले आहे. भाजपने निवडणूक प्रभारीची नियुक्ती केली आहे. यामुळे लोकसभा निवडणूक जवळ आल्याचे दिसून येते. प्रत्यक्षातील आरोप प्रत्यारोपांना सुरवात होण्याआधीच हे समाज माध्यमांकरवी बोचकारे काढणे सुरू झाले आहे.

काँग्रेसने मागितला पुरावा

कॉंग्रेसने या विषयाला राजकीय मार्गानेच प्रत्युत्तर द्यायचे ठरवले. भाजपने गांधी परिवाराचा उल्लेख केल्याने चवताळलेल्या कॉंग्रेसने भाजपच्या राष्ट्रभक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निदान आम्ही राष्ट्रध्वज फडकावला. भाजपने राष्ट्रध्वज फडकावल्याचे छायाचित्र प्रसारित करावे, असे आव्हान दिले आहे.

माफी मागण्याचा सार्वत्रिक सूर

भाजपला समाज माध्यमावर अनेक समर्थक असल्याने राष्ट्रध्वजाच्या अवमानाची बाब राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचली. अनेकांना कॉंग्रेसची ही चूक खुपली. त्यांनी स्वतंत्रपणे समाज माध्यमांवर या विषयी टीकाटिप्पणी करणे पसंत केले. याची एक चर्चा गेल्या २४ तासांहून अधिक काळ समाज माध्यमांवर सुरू आहे. ती चर्चा कॉंग्रेसच्या या चुकीपासून इतर विषयांपर्यंत भरकटत गेली असली तरी कॉंग्रेसने देशाची माफी मागावी असा सार्वत्रिक सूर त्या चर्चेतून दिसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

Bonderam: 'दिवाडी बेट' सजले! ‘बोंदेरा’ उत्साहात साजरा; सामुदायिक एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन

Salvador Do Mundo: साल्वादोर द मुंदचे ग्रामस्थ आक्रमक! कचरा, मैदानाची दुरवस्था, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर

Bhoma: 'मातीच्या भरावामुळे गाव धोक्यात'! भोम ग्रामसभेत संताप; चौपदरी रस्त्याचा प्रश्‍नही चर्चेत

Goa Live News: गोव्यातील फसवणूक प्रकरणात सिंगापूरच्या रहिवाशाला अटक!

SCROLL FOR NEXT