BITS Pilani Dainik Gomantak
गोवा

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

BITS Pilani Student Death: बिट्स पिलानीच्या गोवा कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल या शिक्षण संस्थेला खरेच पडून गेले आहे का, असा प्रश्न ऋषी नायर या २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे उभा राहिला आहे.

Sameer Amunekar

मडगाव: बिट्स पिलानीच्या गोवा कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल या शिक्षण संस्थेला खरेच पडून गेले आहे का, असा प्रश्न ऋषी नायर या २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे उभा राहिला आहे. प्रेयसीच्या आत्महत्येमुळे तणावाखाली आल्याने ऋषीला गोव्यात आणले होते. मात्र, मागील महिनाभर तणावाखाली वावरणाऱ्या ऋषीला बिट्सच्या समुपदेशकांनी एकदाही पाहिले नाही, अशी माहिती पुढे आली आहे.

विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्‍यासाठी बिट्‌सच्‍या सांकवाळ येथील प्रकल्‍पात समुपदेशन केंद्र सुरू केले असून त्‍यात चार समुपदेशकांची नियुक्‍ती केली आहे. त्‍याशिवाय दर आठवड्याला एकदा एक मानसोपचारतज्ज्ञ या केंद्राला भेट देतो. या केंद्रात असे पाच तज्ज्ञ असतानाही तणावाखाली असलेल्‍या ऋषीला तपासावे, असे त्‍यांना का वाटले नाही?

बिट्‌स पिलानीचे जनसंपर्क अधिकारी अर्जुन हळर्णकर यांना याबद्दल विचारले असता, या केंद्राची मदत पाहिजे असल्‍यास विद्यार्थी स्‍वत:हून या केंद्रात येतात. मात्र, ऋषी नायर याने किंवा त्‍याच्‍या पालकांनी मानसिक आधारासाठी आमच्‍या केंद्राशी कधीही संपर्क साधला नाही. त्‍यामुळे आमच्‍या तज्ज्ञांनी त्‍याची तपासणी करण्‍याचा प्रश्‍नच उद्‍भवत नाही, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.

बिट्‌सच्‍या हैदराबाद केंद्रात शिकणाऱ्या ऋषी नायर याच्‍या प्रेयसीने आत्‍महत्‍या केल्‍याने तणावाखाली आलेल्‍या ऋषीला त्‍या वातावरणातून बाहेर काढण्‍यासाठी गोव्‍यात भरती केले होते. ९ ऑगस्‍ट रोजी तो गोव्‍यातील बिट्‌स पिलानी प्रकल्‍पात दाखल झाला होता. मानसिक आजारासाठी त्‍याच्‍यावर उपचार सुरू होते. मात्र, हे उपचार बाहेरच्‍या डॉक्‍टरकडून केले जात होते. बिट्‌सच्‍या केंद्रातील तज्‍ज्ञांकडून त्‍याच्‍यावर कधीच उपचार केले गेले नाहीत, अशी माहिती आता बाहेर आली आहे.

उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून मृत्‍यू

ऋषी नायरच्‍या मृतदेहाची मडगाव जिल्‍हा इस्‍पितळात उत्तरीय तपासणी केली असता, रात्री झोपेत असताना आलेल्‍या उलटीमुळे त्‍याचा श्‍वास गुदमरल्‍यामुळे त्‍याचे निधन झाले, असे कारण पुढे आले आहे.

कदाचित झोपेचा अंमल येणाऱ्या गोळ्‍यांचे जास्‍त सेवन केल्‍यामुळे तो गाढ झोपी गेला आणि त्‍यातच त्‍याला उलटी आल्‍याने तो मृत झाला असावा, असा तर्क व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे. मागच्‍या महिनाभरात त्‍याचे जेवणही बरोबर होत नव्‍हते, अशीही बाब पुढे आली आहे.

सोमवारपासून चौकशी

त्‍याच्‍या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्‍यानंतर पणजीतील स्‍मशानभूमीत त्‍याच्‍या पार्थिवावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. यावेळी त्‍याचे पालक उपस्‍थित होते. या मृत्‍यू प्रकरणात दक्षिण गोव्‍याच्‍या जिल्‍हाधिकाऱ्यांकडून चौकशी होणार आहे. मात्र, आजपासून रविवारपर्यंत सुट्टी असल्‍याने ही चौकशी बहुतेक सोमवारी सुरू केली जाईल, असा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gegeneophis Valmiki: पश्चिम घाटात सापडली उभयचर प्राण्याची 'नवी' प्रजाती! दुर्मीळ केशिलियन; 'जेनेओफीस वाल्मिकी' असे नामकरण

Kashinath Shetye: बेकायदेशीर केबल्सप्रकरणी 2 मोठ्या टेलिकॉम कंपन्यांविरोधात तक्रार, काशिनाथ शेट्येंना जीवे मारण्‍याची धमकी

Chimbel: "..तोपर्यंत आम्ही जागेवरून हटणार नाही"! 21 दिवसांपासून चिंबलवासीयांचे उपोषण सुरूच; प्रकल्पाच्या निर्णयानंतर ठरवणार आंदोलनाची दिशा

ED Raid Anjuna: गोव्यात ईडीची मोठी कारवाई! 2.83 कोटींच्या सापडल्या नोटा; बँक खाती गोठवण्याचे आदेश

Birch Club Fire: 'ठोस नियम नसताना नाईटक्लबला परवानगी कशी दिली'? बर्चप्रकरणी सरपंचाच्या कोठडीसाठी पोलिसांचा युक्तिवाद

SCROLL FOR NEXT