Bison  Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत गवा रेड्यांचा वावर; गावकरी चिंतेत

गवा रेड्यांचा कळप बघून गावातील लोकांना धडकी भरली.

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोली तालुक्यातील अडवलपाल येथे गवा रेड्यांचा कळप गावकऱ्यांच्या नजरेस आला. परिणामी येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी गावामध्ये सुमारे पंधरा गवा रेडे आले होते.

गावकऱ्यांनी सांगितले की, मागील 2 महिन्यात येथे एखाद दुसरा गवा रेडा नजरेस पडत होता. मात्र, परवा अचानक 15 गवा रेडे भरदिवसा एका रांगेत चालत असलेले दिसले.

गवा रेड्यांचा कळप बघून गावातील लोकांना धडकी भरली. या गवा रेड्यांनी शेतीचे आणि बागायतींचे नुकसान केले नसले तरी त्यांची परत गावात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील शेतकऱ्यांनी (Farmers) आणि बागायतदारांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

गवा रेडा शेतीचे (Farm) मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतो. नुकसान झाल्यास त्याची भरपाई कोण करून देणार?, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. गावात गवा रेडे पोहोचल्यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे. वन खात्याने याप्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: राष्ट्रीय महामार्ग अनमोड येथे खचल्याने अनमोड घाटावरुन जाण्यास अवजड वाहनांना प्रवेश बंद

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT