वास्को: विनयभंग करणे, महिलेला सँडल व मुठीने मारहाण करणे, चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देणे तसेच तिच्या कुटुंबातील एका पुरुषाला मारहाण करणे अशा गंभीर गुन्ह्यांखाली वेर्णा पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता, तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिर्ला-उपासनगर येथे राहणारे एक इसम, त्यांची पत्नी व मेहुणी असे तिघेजण काल सोमवारी (ता. २९) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास कारने आपल्या फ्लॅटकडे जात होते. त्यावेळी उपासनगर येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील टोफिक बादशहा शेख याने कोणतेही कारण नसताना कारसमोर दुचाकी आडवी घालून त्यांना अडविले व अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
एवढ्यावर न थांबता टोफिकने त्या इसमाला ढकलले. या प्रकरणी वेर्णा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी चौघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत १२६(२), ३५२, ७४, ७९, ३५१(३) आर/डब्ल्यू ३(५) कलमांखाली संशयितांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमिला फर्नांडिस पुढील तपास करत आहेत.
टोफिकने फोन करून आपल्या तीन मित्रांना घटनास्थळी बोलावले. ते दोन दुचाक्यांवरून तेथे पोहोचले. त्यातील अदनान शेख याने त्या इसमाला पुन्हा ढकलले. त्याचा बचाव करण्यासाठी त्याची पत्नी पुढे आली असता, तिचा विनयभंग करण्यात आला. त्यानंतर टोफिक शेख, आयक्रान जहागीरदार व मिझान सय्यद यांनी त्या इसमाच्या मेहुणीला ढकलले,
त्यामुळे ती जमिनीवर पडली. त्यानंतर तिला सँडल व मुठीने मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर टोफिकने आपल्या दुचाकीच्या डिकीतून चाकू काढून ‘जिंदा काट दूंगा’ अशी धमकी देत सर्वांना भयभीत केले. त्यानंतर ते सर्वजण दुचाक्यांवरून पळून गेले.
टोफिक बादशहा शेख, आयक्रान जहागीरदार, मिझान सय्यद (सर्व रा. हाऊसिंग बोर्ड, उपासनगर), अदनान शेख (टायटन चौक, वेर्णा)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.