Goa Live News: गोव्यात तिसरी जिल्हा पंचायत स्थापन होणार; अध्यक्ष, उपाध्यक्षांची लवकरच निवड

Goa Marathi Breaking News: मराठीमध्ये जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी
Goa live news
Goa live newsDainik Gomantak

गोव्यात तिसरी जिल्हा पंचायत स्थापन होणार; अध्यक्ष, उपाध्यक्षांची लवकरच निवड

गोव्याच्या तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीसोबतच आता राज्यात तिसरी जिल्हा पंचायत देखील अस्तित्वात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली असून, नवीन जिल्हा पंचायतीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नियुक्ती लवकरच केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गोव्याच्या तिसऱ्या जिल्ह्याचे नाव 'कुशावती'; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज एक मोठी घोषणा केली असून, राज्याच्या प्रस्तावित तिसऱ्या जिल्ह्याचे नाव 'कुशावती' असे असेल, असे स्पष्ट केले आहे. यापूर्वी या जिल्ह्यासाठी 'अटल' या नावाची चर्चा सुरू होती, मात्र आता मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे 'कुशावती' या नावावर शिक्कामोर्तब केले आहे

युनिटी मॉलला विरोध: अमित पालेकर चिंबलवासियांसह आंदोलनावर

चिंबल येथे प्रस्तावित 'युनिटी मॉल'विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनात आम आदमी पार्टीचे (AAP) नेते अमित पालेकर सहभागी झाले आहेत. ग्रामस्थांच्या मागणीला पाठिंबा देत पालेकर यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. या गंभीर प्रश्नावर प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. "जनतेचा विरोध डावलून लादले जाणारे प्रकल्प खपवून घेतले जाणार नाहीत," असा इशारा देत पालेकर यांनी आंदोलकांशी संवाद साधला आणि या लढ्यात पूर्णपणे सोबत राहण्याचे आश्वासन दिले.

सांडपाण्यामुळे खारफुटीचा ऱ्हास; कचरा प्रक्रिया प्रकल्पावर गंभीर आरोप

पणजीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या मागील बाजूस असलेल्या मोठ्या क्षेत्रातील खारफुटी सुकल्या असून त्या नष्ट होत असल्याचे समोर आले आहे. प्रकल्पातील प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि मैला पाणी थेट नैसर्गिक जलस्त्रोतात सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक सूत्रांनी केला आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, मौल्यवान खारफुटी परिसंस्थेचे गंभीर नुकसान होत आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

गोव्यात तिसऱ्या जिल्ह्याची तयारी; 'अटल' नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

गोव्यात लवकरच तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती होण्याची शक्यता असून, या जिल्ह्याला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ 'अटल' असे नाव दिले जाण्याचे संकेत मिळत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, केपे हे या नवीन जिल्ह्याचे मुख्यालय असण्याची दाट शक्यता असून, यामध्ये केपे, सांगे, काणकोण आणि धारबांदोडा या चार तालुक्यांचा समावेश केला जाऊ शकतो.

अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, विरोधकांनी या नावाला विरोध दर्शवलेला नाही; मात्र अंतिम निर्णयापूर्वी जनतेशी सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com