Crime News: धक्कादायक! मराठी बोलत नाही म्हणून 6 वर्षांच्या चिमुरडीची हत्या; जन्मदात्या आईनेच घेतला जीव

Mumbai Crime News: आई आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात उघडकीस आली आहे.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

आई आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात उघडकीस आली आहे. आपल्या सहा वर्षांच्या मुलीला नीट मराठी बोलता येत नाही आणि ती हिंदीचा वापर करते, या क्षुल्लक कारणावरून एका महिलेने आपल्या चिमुरडीची हत्या केली. केवळ भाषेचा द्वेष आणि मुलगा हवा असल्याची तीव्र इच्छा या विकृत मानसिकतेतून हे हत्याकांड घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

ही घटना २३ डिसेंबर रोजी घडली. आरोपी महिलेने मुलीची गळा दाबून हत्या केल्यानंतर, हा मृत्यू नैसर्गिक दाखवण्याचा प्रयत्न केला. तिने आपल्या पतीला आणि नातेवाईकांना सांगितले की, मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. घटनेच्या दिवशी मुलीची आजी तिला भेटायला आली होती, मात्र आईने काहीतरी कारण सांगून त्यांना भेटू दिले नाही. संशयास्पद मृत्यू वाटल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू केला.

Crime News
Goa Traffic Update: बीच सेलिब्रेशनसाठी गोव्याला चाललाय? वाहतूक नियमांत मोठा बदल; पार्किंग, पर्यायी रस्त्यांची माहिती घ्या एका क्लिकवर..

कळंबोली पोलिसांनी मृतदेहाचे विशेष शवविच्छेदन (Post-mortem) करण्याचा निर्णय घेतला. अहवालात मुलीच्या श्वसननलिकेत अडथळा निर्माण झाल्याचे आणि गळा दाबल्याच्या खुणा असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी जेव्हा आईची सहा तास कसून चौकशी केली, तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी महिलेचे मानसिक आरोग्य बिघडलेले असून तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

Crime News
Goa Politics: बनावट मतदारयादीचा मडगावात प्रयत्न! कॉंग्रेस नेते आक्रमक; BLA, BLOना निलंबित करण्याची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे लग्न २०१७ मध्ये एका आयटी इंजिनिअरसोबत झाले होते. २०१९ मध्ये तिला मुलगी झाली, मात्र तिला मुलगा हवा होता. मुलगी जन्माला आल्यापासून ती नाराज होती. त्यातच मुलीला बोलण्यास थोडी अडचण होती आणि ती मराठीऐवजी हिंदी बोलत असे. "मला अशी मुलगी नको आहे जी धड बोलू शकत नाही," असे ती वारंवार पतीला सांगत असे. पतीने तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, पण अखेर तिच्या संतापाचा बळी त्या निष्पाप बालिकेला द्यावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com