Birch Nightclub Fire Case Dainik Gomantak
गोवा

Birch Nightclub Fire Case: बर्च प्रकरणात भरपाईचा सुवर्णमध्य निघणार? 20 लाखांच्या प्रस्तावावर अद्याप शिक्कामोर्तब नाही

Birch by Romeo Lane Fire Case: न्यायालयाकडून सुमारे २० लाख रुपये जमा केले जावेत, अशी केवळ एक सूचना किंवा प्रस्ताव समोर आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: न्यायालयाकडून सुमारे २० लाख रुपये जमा केले जावेत, अशी केवळ एक सूचना किंवा प्रस्ताव समोर आला आहे. मात्र, न्यायालयाने यावर अद्याप कोणताही अधिकृत आदेश दिलेला नाही. कोणतीही औपचारिक किंवा अंतिम मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यापूर्वी न्यायालयाकडून पीडितांच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांची बाजू ऐकून घेण्यात येईल आणि त्यानंतरच पुढील आदेश दिला जाणार असल्याची माहिती महाधिवक्ता देविदास पांगम यांनी दिली.

जखमींवरील उपचार आणि तातडीचे साहाय्य लक्षात घेता, न्यायालयाने अंतरिम व्यवस्थाअंतर्गत सुमारे २० लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले जाण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, न्यायालयाने अद्याप यावर कोणताही औपचारिक आदेश जारी केलेला नाही. न्यायालयाने पीडितांच्या नातेवाईकांच्या वकिलांना या सर्व प्रस्तावांची व आकड्यांची माहिती नातेवाईकांपर्यंत पोहोचवून त्यांचे मत जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणीवेळी सर्व पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालय यावर अंतिम अंतरिम आदेश पारित करेल.

हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या अत्यंत गंभीर घटनेनंतर, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या दुर्घटनेची ‘स्वेच्छा दखल’ घेत जनहित याचिका दाखल करून घेतली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मृतांच्या नातेवाईकांना देण्यात येणाऱ्या आर्थिक भरपाईच्या मुद्यावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

याविषयी महाधिवक्ता देवदास पांगम यांनी माहिती देताना स्पष्ट केले की, सध्या न्यायालयात नुकसानभरपाईच्या संदर्भात दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. नाईटक्लब मालक यांच्याकडून पीडितांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांची आर्थिक भरपाई देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. मात्र, दुसरीकडे पीडितांच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी ५० लाख रुपयांच्या भरपाईची मागणी लावून धरली आहे.

महाधिवक्त्यांनी स्पष्ट केले की, या दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर, एक अंतरिम (तात्पुरती) व्यवस्था म्हणून काहीतरी सुवर्णमध्य काढण्यात यावा, असा सल्ला आम्ही दिला आहे. ही कोणतीही अंतिम तडजोड नसून मुख्य खटला कामगार आयुक्तांकडे ‘कामगार नुकसानभरपाई कायद्यांतर्गत’ स्वतंत्रपणे सुरू राहील आणि त्या खटल्याची सुनावणी अत्यंत वेगाने पूर्ण केली जाईल.

घटनेची पार्श्वभूमी

डिसेंबर २०२५ मध्ये हडफडे येथील बर्च क्लबमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीमुळे लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची गंभीरता व प्रशासकीय निष्काळजीपणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वतःहून याचिका दाखल केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Poverty Report: खायला अन्न नाही, राहायला घर नाही! पाकड्यांची पोलखोल करणार UNDP रिपोर्ट; 38 टक्के लोक गरिबीच्या खाईत

Goa Water Crisis: गोव्यात पावसाची विक्रमी तूट, तापमान 37 अंशांपार! आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट?

Mumbai Indians Captaincy: रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन बनवण्याच्या बातम्या अफवाच, एमआयने कर्णधारपदाबाबत स्पष्टचं सांगितलं; समोर आली महत्त्वाची माहिती

Goa Undeclared Assets: गोव्यातील 1200 लोकप्रतिनिधींची नावे जाहीर! मालमत्तेचे विवरणपत्र न दिल्याने लोकायुक्तांची कारवाई

Goa Waste Management: साळगावचा कचरा प्रकल्प 25 दिवस बंद! उत्तर गोव्यात कचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT