Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Luthra Brothers: ‘बर्च क्लब’प्रकरणी मोठी बातमी! दारू परवान्यासाठी वापरली बनावट ‘एनओसी’; लुथरांचा जामीन फेटाळला

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंनी त्यांच्या ‘बर्च क्लब’ व्यवसायासाठी अबकारी विभागाकडून दारूचा परवाना मिळवताना कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बनावट प्रमाणपत्र वापरल्याचा आरोप आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : दारू परवाना मिळवण्यासाठी बनावट आरोग्य ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (हेल्थ एनओसी) सादर केल्याच्या आरोपाखाली म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने संशयित गौरव आणि सौरभ लुथरा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी फेटाळून लावला. सध्या लुथरा बंधू कोलवाळ कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

लुथरा बंधूंनी त्यांच्या ‘बर्च क्लब’ व्यवसायासाठी अबकारी विभागाकडून दारूचा परवाना मिळवताना कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बनावट प्रमाणपत्र वापरल्याचा आरोप आहे.

हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबमधील भीषण अग्निकांडानंतर कागदपत्रांची छाननी करताना हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी बनावटगिरीचा गुन्हा नोंद केला आहे.

१ एप्रिलपर्यंत निकाल राखून

हडफडे येथील बर्च क्लब अग्निकांड प्रकरणात गौरव आणि सौरभ लुथरा यांच्या जामीन अर्जावरील निर्णय १ एप्रिलपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. साकवाडी, हडफडे येथे ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले होते. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी १४ संशयितांविरुद्ध आरोपपत्र सादर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: अंगाची लाही-लाही! वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण; तापमानाची पस्तीशीपार

'पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 3 रुपये, डिझेलवरील शून्यावर'! पंतप्रधानांविषयी CM सावंतांकडून गौरवोद्गार; राजनैतिक संवादाचीही केली प्रशंसा

Soham Naik: सोहमच्या जाळ्यात 20 पेक्षा जास्त मुलींचा बळी! ‘स्नॅपचॅट’वरून हेरायचा सावज; अजून नावे पुढे येण्याची शक्यता

Goa Crime: 'मोपा'वर मोठी कारवाई! 8 कोटींचे अमली पदार्थ जप्त; बँकॉक, अबूधाबीतून आलेल्या 5 प्रवाशांना अटक

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्री ‘ॲक्टिव्ह’

SCROLL FOR NEXT