Birch Nightclub Fire: बर्च प्रकरणातील ‘स्लिपिंग पार्टनर’ अजय गुप्ताला दिलासा! सशर्त जामीन मंजूर; 50 हजारांचा जातमुचलका

Arpora Birch Nightclub Fire: ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबमधील भीषण अग्नीतांडव प्रकरणात अटकेत असलेला सह-मालक अजय गुप्ता याला म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला.
Ajay Gupta bail arpora nightclub
Ajay Gupta bail arpora nightclubDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबमधील भीषण अग्नीतांडव प्रकरणात अटकेत असलेला सह-मालक अजय गुप्ता याला म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला. हणजूण पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला.

न्यायालयाने गुप्ताला ५० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तितक्याच रकमेचा एक जामीनदार सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जामीन मंजूर करताना न्यायालयाने नेमकी कोणती निरीक्षणे नोंदविली आहेत, हे सविस्तर आदेशानंतर स्पष्ट होणार आहे.

६ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात, नाईट क्लबला अबकारी परवाना मिळवण्यासाठी कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचा बनावट एनओसी वापरल्याचे उघड झाले होते.

बचाव पक्षाने मांडलेल्या युक्तिवादानुसार, अजय गुप्ता हा कंपनीत केवळ १० टक्के हिस्सा असलेला ‘स्लिपिंग पार्टनर’ असून, दैनंदिन कामकाजात त्याचा कोणताही सहभाग नव्हता. याआधी बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात त्याला जामीन मिळाला होता; मात्र मुख्य प्रकरणात तो कोलवाळ कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.

Ajay Gupta bail arpora nightclub
Birch Nightclub Fire: आरोपपत्राला 24 तास होण्याआधीच रेडकर, बागकर यांना सशर्त जामीन; 'ईडी'मार्फत चौकशी शक्य

आता आरोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयाने त्याला अटींसह दिलासा दिला आहे. अटींमध्ये पासपोर्ट जमा करणे, पुराव्यांशी छेडछाड न करणे यांचा समावेश आहे. सुनावणीदरम्यान गुप्ताची पत्नी व अन्य नातेवाईक न्यायालयात उपस्थित होते.

दरम्यान, हणजूण पोलिसांनी या प्रकरणात ४ हजारांहून अधिक पानांचे दोषारोपपत्र दाखल केले असून, खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे.

Ajay Gupta bail arpora nightclub
Bibati Tree: गोव्यात आढळले दुर्मीळ ‘बिबटी झाड’! जगात 8वे तर राज्यात दुसरे असल्याचा दावा; मलबार फुलपाखरांचाही अधिवास

लुथरांकडून जामिनासाठी पुन्हा अर्ज

क्लबचे मालक असलेल्या सौरभ व गौरव लुथरा यांचा १२ फेब्रुवारी २०२६ रोजी जामीन अर्ज फेटाळला होता. सध्या दोघांनी पुन्हा एकदा जामिनासाठी फ्रेश (नवीन) अर्ज केला असून, त्याची पुढील सुनावणी २४ मार्च रोजी आहे. दुसरीकडे, माजी सरपंच रोशन रेडकर यांना यापूर्वी जामीन मंजूर झाला आहे. बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर यांनाही जामीन मिळालेला आहे. जमिनीचे मालक सुरिंदर कुमार खोसला (ब्रिटीश नागरिक) हे अद्याप फरार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com