Luthra Brothers Granted Bail Mapusa Court Dainik Gomantak
गोवा

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

Luthra Brothers Granted Bail Mapusa Court: हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबमध्ये लागलेल्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या आग प्रकरणात एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली.

Manish Jadhav

Luthra Brothers Granted Bail Mapusa Court: हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबमध्ये लागलेल्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या आग प्रकरणात एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली. 25 निष्पाप लोकांचा बळी गेलेल्या या भीषण दुर्घटनेतील मुख्य संशयित आरोपी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा या दोघांनाही म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. 6 डिसेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेने संपूर्ण गोव्याला हादरवून सोडले होते, ज्यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

हडफडे येथील या नाईट क्लबमध्ये लागलेली आग ही केवळ अपघात नसून ती मानवनिर्मित निष्काळजीपणाचा कळस असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन, आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांची कमतरता आणि अग्निरोधक यंत्रणेचा अभाव यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर पडता आले नाही. या धक्कादायक घटनेनंतर संतापजनक बाब म्हणजे, ज्यावेळी अग्निशमन दलाचे जवान ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढत होते आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु होते, त्याचवेळी 7 डिसेंबरच्या पहाटे लुथरा बंधूंनी मुंबईहून थायलंडला पळ काढला होता.

परदेशात पलायन केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली होती आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. म्हापसा (Mapusa) न्यायालयात जामिनासाठी झालेल्या सुनावणी दरम्यान, आरोपींच्या वकिलांनी आणि सरकारी अभियोक्त्यांनी जोरदार युक्तिवाद केला. अखेर न्यायालयाने काही कडक अटी घालून लुथरा बंधूंना जामीन देण्याचा निर्णय घेतला. या जामिनाच्या अटींनुसार, आरोपींना तपासात पूर्ण सहकार्य करावे लागणार असून पुराव्यांशी छेडछाड न करण्याची सक्त ताकीद देण्यात आली. दुसरीकडे मात्र, 25 जणांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेतील दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT