Arpora nightclub fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: '25 लाखांचा हप्ता आणि 25 बळी', लाचखोरीमुळे निष्पापांचा गेला जीव, खासदार विरियातोंचा दावा; सरकारला धरले धारेवर

Birch by Romeo Lane bribe: दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले

Akshata Chhatre

गोव्यातील राजकारण सध्या हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेने ढवळून निघाले आहे. दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले.

प्रशासकीय निष्काळजीपणा की नियोजित भ्रष्टाचार?

या नाईट क्लबचे कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाला दरमहा २५ लाख रुपयांची लाच दिली जात होती, असा दावा फर्नांडिस यांनी केलाय. या भ्रष्टाचारामुळेच सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष झाले आणि २५ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला, असे त्यांनी स्पष्ट केले.

कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी या दुर्घटनेला नैसर्गिक आपत्ती न मानता 'प्रशासकीय हत्या' असे संबोधले. त्यांच्या मते, हडफडे येथील नाईट क्लबमध्ये घडलेली ही शोकांतिका म्हणजे भ्रष्ट यंत्रणा आणि जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्ष्याचा परिणाम आहे.

"जेव्हा नियम धाब्यावर बसवून व्यवहार केले जातात, तेव्हा अशाच प्रकारच्या भीषण घटना घडतात," असे सांगत त्यांनी या मृत्यूंना सर्वस्वी राज्य सरकारला जबाबदार धरले. या प्रकरणात केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई न करता, सत्तेत बसलेल्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली.

केंद्राची दिशाभूल आणि पंचायती राजचा बळी

केवळ नाईट क्लब प्रकरणावरच न थांबता, फर्नांडिस यांनी सरकारवर घटनात्मक फसवणुकीचाही आरोप केला. ७३ व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करण्याबाबत गोवा सरकारने केंद्र सरकारला चुकीची माहिती दिली असल्याचा दावा त्यांनी केला.

राज्यात पंचायती राज व्यवस्था सक्षम असल्याचे भासवले जात असले, तरी प्रत्यक्षात सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार देण्याऐवजी, सर्व निर्णय वरच्या स्तरावरून लादले जात असल्यामुळेच स्थानिक पातळीवर भ्रष्टाचाराचे जाळे पसरले असल्याचे खासदार म्हणाले.

प्रशासकीय कोलमडलेली यंत्रणा

राज्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि पारदर्शकतेचा अभाव यावर बोट ठेवत, फर्नांडिस यांनी राज्य प्रशासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. हडफडे अग्नितांडवातील दोषींना पाठीशी घालण्याचे प्रयत्न थांबवून, जनतेला उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी केलेय.

प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून, जोपर्यंत जबाबदारी निश्चित केली जात नाही तोपर्यंत गोव्यातील जनतेचा जीव असाच टांगणीला राहील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Porvorim News: पर्वरीच्या रस्त्यावर 'बिअर'चा पूर! धावत्या ट्रकवरून बॉक्स कोसळले, काचेच्या तुकड्यांमुळे वाहतूक धोक्यात

Viral Video: संसद की कुस्तीचा आखाडा? लोकशाहीच्या पवित्र मंदिरात महिला खासदारांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी; एकमेकींचे केस ओढले अन् थप्पडही लगावले

समुद्राचा नवा 'सिकंदर'! भारतीय नौदलात 'रोमियो' हेलिकॉप्टरचा दुसरा स्क्वॉड्रन दाखल; चीन-पाकिस्तानच्या पाणबुड्यांना शोधून मारणार VIDEO

Video: धुरंधर यश मिळतोय, मग अक्षय खन्ना कुठंय? रेहमानचा आध्यात्मिक अवतार, अलिबागच्या घरात करतोय 'होम हवन'

SCROLL FOR NEXT