Romeo Lane Fire Case Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

मुख्य संशयित आरोपी गौरव आणि सौरभ लुथरा यांना अखेर म्हापसा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (JMFC) न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Akshata Chhatre

Gaurav Luthra Saurabh Luthra custody: गोव्याला हादरवून सोडणाऱ्या हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लब आग प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गौरव आणि सौरभ लुथरा यांना अखेर म्हापसा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (JMFC) न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

थायलंड ते दिल्ली आणि मग पोलिसांच्या बेड्या

२५ निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या या भीषण दुर्घटनेनंतर लुथरा बंधू फरार झाले होते. मात्र, गोवा पोलिसांनी अतिशय वेगाने तपास चक्रे फिरवून या दोघांना दिल्लीतून अटक केली आणि बुधवारी गोव्यात आणले.

लुथरा बंधू हे या दुर्घटनेनंतर देश सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. ते थायलंडमधील बँकॉक येथे वास्तव्यास होते. मात्र, १६ डिसेंबर रोजी ते थायलंडहून दिल्लीत दाखल होताच, दबा धरून बसलेल्या गोवा पोलिसांच्या पथकाने त्यांना विमानतळावरच बेड्या ठोकल्या.

यापूर्वी त्यांनी दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती, पण न्यायालयाने त्यांच्या विरोधातील गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जामीन फेटाळून लावला होता. बुधवारी सकाळी ११ वाजता कडक पोलीस बंदोबस्तात त्यांना मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले.

पोलीस कोठडीत होणार अवैध संचालनाची चौकशी

हणजूण पोलिसांनी न्यायालयात युक्तिवाद करताना या आरोपींची सखोल चौकशी करण्यासाठी १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. नाईट क्लबचे संचालन, सुरक्षेतील त्रुटी आणि परवान्यांची वैधता याबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागणे बाकी आहे.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. या ५ दिवसांत पोलिसांना या प्रकरणातील भ्रष्टाचाराचे आणि दुर्लक्ष्याचे मूळ शोधून काढावे लागणार आहे.

वैद्यकीय तक्रारी आणि कडक सुरक्षा

सुनावणीदरम्यान लुथरा बंधूंनी प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना तात्काळ हणजूण पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.

२५ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलीस कोठडीत काय गौप्यस्फोट करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT