Birch by Romeo Lane fire Dainik Gomantak
गोवा

Arpora Nightclub Fire : हडफडे अग्नितांडव! अजय गुप्ताला दिल्लीतून अटक, 'गोगी टोळी'सह 'काळ्या पैशाचे' लागेबांधे उघड

Ajay Gupta Detained : दिल्लीतून ताब्यात घेण्यात आलेला आरोपी अजय गुप्ता हा केवळ क्लबचा भागीदार नाही, तर त्याचे संबंध आणि आर्थिक व्यवहार अत्यंत संशयास्पद आहेत

Akshata Chhatre

Romeo Lane Fire Accused Ajay Gupta Arrested: हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबमधील भीषण आगीप्रकरणी दिल्लीतून ताब्यात घेण्यात आलेला आरोपी अजय गुप्ता हा केवळ क्लबचा भागीदार नाही, तर त्याचे संबंध आणि आर्थिक व्यवहार अत्यंत संशयास्पद असून गोवा पोलिसांनी आता गुप्ताच्या लुथरा बंधूंशी असलेल्या आर्थिक व्यवहारांच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अजय गुप्ता पोलिसांच्या ताब्यात

क्लबचे मुख्य मालक सौरभ आणि गौरव लुथरा हे घटनेनंतर थायलंड येथे पळून गेले आहेत. त्यांना भारतात परत आणण्यासाठी गोवा पोलिसांनी इंटरपोलची 'ब्ल्यू कॉर्नर नोटीस' जारी केली आहे. गोवा पोलिसांनी अजय गुप्ताला नवी दिल्लीतून ताब्यात घेतले असून, त्याला ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणले जाईल. या दुर्घटनेत केवळ बेकायदेशीर क्लब व्यवस्थापनच नव्हे, तर त्यामागील गुन्हेगारी आणि संशयास्पद आर्थिक साखळी देखील समोर येण्याची शक्यता आहे.

गुप्ता बंधू आणि 'गोगी टोळी'चा संबंध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय गुप्ताच्या कुटुंबाची पार्श्वभूमीही गुंतागुंतीची आहे. अजय गुप्ताचा भाऊ अमित गुप्ता हा उत्तर दिल्लीतील एक प्रसिद्ध बिल्डर होता. सुमारे दोन वर्षांपूर्वी बुरारी येथे त्याची हत्या करण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार ही हत्या कुख्यात 'गोगी टोळीने' केल्याचा आरोप आहे.

अमित गुप्ताच्या मृत्यूनंतर, त्याने अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचे पैसे बाजारात गुंतवले होते, हे उघड झाले. अमितच्या मृत्यूनंतर, अजय गुप्ता याच पैशांचे व्यवस्थापन आणि गुंतवणूक बाजारात करत होता.

'रोमिओ लेन'मध्ये मोठे आर्थिक जाळे

लुथरा बंधू आणि गुप्ता बंधू यांच्यातील आर्थिक संबंधांचे जाळे आता गोवा पोलिसांच्या रडारवर आलेय. दोन्ही गुप्ता बंधूंनी (अमित आणि अजय) लुथरा बंधूंच्या क्लब्समध्ये मोठी रक्कम गुंतवली होती. ही गुंतवणूक लुथरा बंधूंचे क्लब बेकायदेशीरपणे चालत असतानाही करण्यात असल्याने या गुंतवणुकीच्या स्रोतावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेय.

गोवा पोलिसांना आता याच गुंतवणुकीच्या आणि वित्तीय व्यवहारांच्या माध्यमातून क्लबच्या बेकायदेशीर कामकाजातील अजय गुप्ताचा सहभाग आणि क्लबचा खरा अर्थपुरवठा शोधायचा आहे.

मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश: ६ जणांना अटक, अधिकाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार

क्लबमधील अग्नितांडवाच्या घटनेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईची माहिती दिली. मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले की, रोमिओ लेन आग प्रकरणास जबाबदार असलेल्यांवर कारवाया सुरूच आहेत. आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली असून, यात सहभागी असलेल्या इतर १००% आरोपींनाही अटक करण्यात येईल.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी जो अधिकारी चौकशीसाठी येत नाही त्याला देखील अटक होईल. यापूर्वीच तीन संबंधित अधिकारी निलंबित करण्यात आलेत तर दोघांची चौकशी सुरू आहे. पर्यटनाशी संबंधित ज्या आस्थापनांनी अग्निसुरक्षेचे नियम पाळलेले नाहीत, त्यांची आस्थापने काही दिवसांसाठी बंद करण्यात येतील, असा इशाराही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणुसकीशून्य कोडगेपणा! तत्परतेसाठी 25 लोक जळून मरायची वाट का पाहिली? देशभर नाचक्की झाल्यावर 'इभ्रत' राखण्याची मोहीम- संपादकीय

अग्रलेख: शनिवारची रात्र ठरली भयाण किंकाळ्यांची! हडफडे अग्निकांडाने उफळला संताप, 25 बळींचा हिशोब कोण देणार?

Arpora Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेला कायदेशीर वळण! 'एसआयटी' चौकशीसाठी हायकोर्टात याचिका दाखल; 16 डिसेंबरला सुनावणी

वास्कोत भररात्री गोंधळ! प्रार्थनास्थळी दानपेटी फोडली, मूर्तीचे नुकसान, अंतर्वस्त्रे घालून फिरणाऱ्या व्यक्तीवर संशय; कोण आहे हा 'अर्धनग्न' संशयित?

Goa Live Updates: सेंट अँथनी चॅपलमध्ये तोडफोड; सीसीटीव्ही फुटेजवरून नौदल कर्मचारी नवनीत सिंगला अटक

SCROLL FOR NEXT