Arrests  Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: नाईट क्लब दुर्घटना प्रकरणात 'पाचवी' अटक, भरत कोहलीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मालकाचा शोध सुरु

Goa Nightclub Fire Update: गोव्यातील बहुचर्चित 'बर्च बाय रोमियो लेन' दुर्घटना प्रकरणाच्या तपासाला आता अधिक गती मिळाली आहे.

Manish Jadhav

Goa Nightclub Fire Update: गोव्यातील बहुचर्चित 'बर्च बाय रोमियो लेन' दुर्घटना प्रकरणाच्या तपासाला आता अधिक गती मिळाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाचवी अटक केली. संबंधित क्लब मालकाच्या वतीने दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. भरत सिंग कोहली (वय 49, सब्जी मंडी, दिल्ली) असे या अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पाचवी अटक आणि जबाबदारी

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीच्या घटनेनंतर सातत्याने तपास सुरु आहे. अटक करण्यात आलेला भरत सिंग कोहली हा क्बल मालकाच्या वतीने क्लबच्या दैनंदिन व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत होता. या भूमिकेमुळे, क्लबमधील सुरक्षा आणि नियमांचे पालन करण्याची त्याची प्राथमिक जबाबदारी होती. त्यामुळे अपघाताला जबाबदार धरुन त्याला अटक करण्यात आली.

क्लब मालकाचा शोध

या प्रकरणात क्लबचा मूळ मालक देखील आरोपी असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. मालक सध्या फरार असून त्याला अटक करण्यासाठी गोवा पोलिसांचे (Goa Police) एक पथक आधीच दिल्लीत तळ ठोकून आहे. लवकरात लवकर मालकालाही ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती गोवा पोलिसांनी दिली.

शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरु

या प्रकरणात तपास केवळ व्यवस्थापनापुरता मर्यादित न ठेवता परवानग्या आणि नियमांचे पालन तपासण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरु झाली आहे. क्लबला विविध परवाने जारी करण्यात आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या चौकशीतून नियमांचे उल्लंघन आणि प्रक्रियात्मक त्रुटी तपासल्या जात आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी परवाने देताना सर्व नियमांचे योग्य पालन केले होते का? याची पडताळणी पोलीस करत आहेत.

दुसरीकडे, गोवा (Goa) पोलिसांनी स्पष्ट केले की या प्रकरणाचा तपास प्राधान्याने सुरु आहे आणि तपासणीतून समोर येणाऱ्या निष्कर्षांवर आधारित पुढील कठोर कारवाई केली जाईल. या आगीच्या घटनेनंतर गोव्यातील रेस्टॉरंट आणि पबच्या सुरक्षिततेच्या नियमांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Rajyoga: राजयोगांचा राजा 'नवपंचम योग'! 30 वर्षांनंतर नशीब चमकवणार शनी-बुध; 'या' राशींना मिळणार कुबेराचा खजिना

Goa Murder: 100 रुपयांचा 'रबर मुकुट' बनला रशियन तरुणींचा काळ! खुनी आलेक्सेईच्या फोनमध्ये सापडले 100 हून अधिक महिलांचे फोटो

"आधी संबंध ठेवता अन् नंतर मुलींच्या चारित्र्यावर संशय घेता?", लिव्ह-इन नात्यावर हायकोर्टाची कठोर टिप्पणी; काय नेमकं प्रकरण?

Pakistani Army: दहशतवादाचं फंडिंग आणि पश्तूनांची हत्या! दावोसमध्ये पाकिस्तानी लष्कराचा फाटला बुरखा

Old Buses in Goa: कालबाह्य बसगाड्यांमुळे गोव्याची हवा झाली विषारी! प्रदूषणाचे नियम धाब्यावर; प्रवाशांचा जीव टांगणीला

SCROLL FOR NEXT