biomethanation Project in Bicholim
biomethanation Project in Bicholim Dainik Gomantak
गोवा

Biomethanation Project in Bicholim : डिचोलीतील बायो-मिथेशन प्रकल्प पूर्ण

गोमन्तक डिजिटल टीम

Biomethanation Project in Bicholim : डिचोली पालिकेच्या लाखेरे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला आता स्वयंनिर्मित वीज उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पात बायो-मिथेशन प्रकल्प उभारण्यात आला असून, लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पातून कचऱ्यापासून एकाचवेळी गॅससह खत निर्मिती होणार असून, गॅसपासून वीज निर्मिती होणार आहे. यामुळे पालिकेच्या कचरा प्रकल्पावरील खर्चात बचत होणार आहे. सोमवारपासून (14 नोव्हेंबर ) जनरेटरच्या मदतीने बायो-मिथेशन प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असून, पुढील महिन्यापासून गॅसपासून वीज निर्मिती होणार आहे.

सुमारे सव्वा दोन कोटी खर्चून 650 चौरस मीटर जागेत पुणे येथील 'मेल्हम इकोज एन्व्हायरमेंट' या कंपनीतर्फे हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या 'बायोमॅथानेशन' प्रकल्पातून तिहेरी फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगातर्फे हा प्रकल्प उभारण्यात आला असून, त्याचा आर्थिक भार राज्य सरकारतर्फे उचलण्यात आला आहे.

प्रकल्पातील डीजी उपकरणात ओला कचरा टाकल्यानंतर त्यावर प्रक्रिया होऊन कॉन्हव्हर्टमधून गॅस निर्मिती होणार असून, या गॅसपासून 40 केव्ही वीज निर्मिती होणार आहे. तर प्रक्रियेनंतर शिल्लक राहणाऱ्या टाकाऊ कचऱ्यापासून खत तयार होणार आहे. तयार होणाऱ्या गॅसमधील साधारण 20 टक्के कचरा प्रक्रिया प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांना चहा, स्वयंपाक आदी पदार्थ शिजवण्यासाठी वापरता येणार आहे. या प्रकल्पातून दरदिवशी 300 युनिट वीज निर्मिती होणार आहे. तयार होणारी वीज प्रकल्पासाठी तसेच पदपथ दिवे प्रकाशमय करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या खर्चात बचत होणार असून, गॅस आणि खत विक्रीतून आर्थिक कमाईही होणार आहे.

कचरा प्रकल्प स्वयंपूर्ण

बायोमिथेशन प्रकल्पामुळे कचरा प्रकल्प स्वयंपूर्ण बनणार आहे. बायोमिथेशन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर वीज निर्मितीसाठी आवश्यक गॅस तयार होण्यासाठी किमान वीस दिवस लागणार आहेत. कचरा प्रक्रियेनंतर बाहेर सुटणारे पाणी आणि खत कचरा प्रकल्पातील झाडांना वापरण्यात येईल. अतिरिक्त खताची विक्री करण्यात येईल, अशी माहिती नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT