1st Doctor DainikGomantak
गोवा

कोपार्डेतील बिंदिया ठरली पहिली होमिओपॅथिक डॉक्टर

सत्तरी धनगर समाजात मुलींचीच चमक

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: सत्तरी तालुक्यात धनगर समाजात प्रथमच यंदा दोन मुलींनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी प्राप्त केली आहे. यामूळे समाजाला नावलौकिक मिळवून दिल्याची घटना ताजी असतानाच कोपार्डे सत्तरी येथिल बिंदीया गंगाराम हुमाणे हिने होमिओपॅथिक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ( Bindiya became the first homeopathic doctor )

अशी ती पहिली होमिओपॅथिक डॉक्टर बनल्याने साठ वर्षांची पोकळी भरून काढताना एकाच वर्षात तीन मुली डॉक्टर झाल्याचा आनंद द्विगुणित होत आहे. डॉ. शिवानी मोटे व डॉ. पूनम झोरे यांच्या पाठोपाठ डॉ बिंदिया हुमाणे हीचे देखील सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पुर्वीच्या काळी सत्तरी तालुक्यातील डोंगराळ भागात राहणारा धनगर समाज गोवा मुक्ती नंतरच्या काळापासून विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी गावगिऱ्या वाठारांत विसावाला,त्यामुळे गेल्या तीन दशकांपूर्वी शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या या समाजात हळूहळू शिक्षण स्तरावर बरीच मुले पुढे येत असल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे धनगर समाजाच्या मुलांनी शिक्षण क्षेत्रात उच्च भरारी घेतली आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परंतू गोवमुक्ती नंतरच्या काळापासून आज पर्यंत या तालुक्यातील धनगर समाजात अद्याप कोण डॉक्टर बनलेले नाहीत. पण उशिरा का होईना एकाच वर्षात या समाजातील तीन मुलींनी वैद्यकीय क्षेत्रात नेत्रदीपक अशी कामगिरी करुन दाखवली आहे.

डॉ. बिंदिया हुमाणेच्या मेहनतीला सलाम

सत्तरी तालुक्यातील कोपार्डे गावात राहणाऱ्या डॉ. बिंदिया गंगाराम हुमाणे हिचे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण कोपार्डे येथिल सरकारी प्राथमिक शाळेत झाले. लहान वयातच हुशार असलेल्या बिंदियाने इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण वाळपई येथिल हनुमान विद्यालयातून पूर्ण केले.

पर्ये येथिल भुमिका उच्च माध्यमिक विद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली व वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्याचे स्वप्न बघितलेल्या बिंदियाने होमिओपॅथिक डॉक्टर बनण्यासाठी शिरोडा येथील श्री कामाक्षी होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळ येथे प्रवेश मिळवून साडेचार वर्षांचा आपला वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. यामूळे सत्तरी तालुक्यांत धनगर समाजा मध्ये पहीली होमिओपॅथिक डॉक्टर बनल्याचा मान मिळवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT